बल्लारपूर:- तालुक्यातील विसापूर येथील विज पुरवठा वारंवार खंडीत होत असुन सामान्य माणसाला याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे वारंवार खंडीत होणाऱ्या विजपुरवठ्यामूळे शालेय विद्यार्थी छोटे व्यवसाहिक यांना याचा जास्त त्रास सहन करावा लागत आहे तेव्हा आपण आपल्या स्तरावर योग्य ती चौकशी करून सदर परीसरातील वारंवार खंडीत होणारा विजपुरवठा तात्काळ सुरळीत करण्याच्या सूचना संबंधितांना देण्यात यावे
Fix frequent power cuts in Visapur village immediately
सदर मागणी आठ दिवसाचे आत पूर्ण न झाल्यास ग्रामवासीयांना घेऊन मनसे कडून आक्रमक आंदोलन करण्यात येणार असून याला सर्वस्वी संबधीत प्रशासन जबाबदार असेल या आशयाचे निवेदन मनसेचे जिल्हा सचिव (बल्लारपूर विधानसभा) किशोर मडगुलवार तथा मनविसे जिल्हा उपाध्यक्ष कुलदिप चंदणखेडे यांच्या नेतृत्वात बल्लारपूर महिलासेना तालुकाध्यक्षा कल्पना पोर्तलावार करन कुमले मनसैनिक यांनी महावितरणचे मुख्य अभियंता यांना देण्यात आले असून निवेदन देतांना मनसे पदाधिकारी तथा मनसैनिक उपस्थीत होते
0 comments:
Post a Comment