वरोरा तालुका प्रतिनिधी :-वरोरा येथील सार्वजनिक गणेश उत्सव विसर्जन दरम्यान वरोरा मुस्लिम एकता मंचच्या वतीने येथील कच्छी मशिदीजवळील मंडपात गणेश मंडळ अध्यक्ष, पोलीस अधिकारी व लोकप्रतिनिधींचे शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. वरोरा हे एक शांत शहर आहे जिथे ईद ए मिलाद, गणपती, मोहरम इतर सण शहरातील एकोपा राखण्यासाठी आणि सर्वांमध्ये आंतरधर्म आणि समानतेचा संदेश देण्यासाठी सर्व समुदायातील नागरिक साजरे करतात.
Ganesh Mandal president and dignitaries were felicitated by Warora Muslim Ekta Manch
वरोरा येथे मिरवणुकीत पुष्पवृष्टी करून गंगा-जमुनी संस्कृतीचा नमुना सादर करण्यात आला. सकाळपासूनच मिरवणूक निघाली होती
या शोभायात्रेचे स्वागत आणि सर्व गणेश मंडळ अध्यक्षांचा सत्कार करण्याची संधी आम्हाला मिळाली ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे. वरोरा मुस्लिम एकता मंच गेल्या 13 वर्षांपासून हे काम करत आहे. धर्म इस्लाम इतर धर्मांचा आदर करायला शिकवतो. यावेळी वरोरा मुस्लिम एकता मंचचे अध्यक्ष आसिफ रजा, छोटू शेख, नियाज सय्यद, सादिक थैम, अशरफ बकाली, वसीम शेख यांच्यासह मुस्लिम समाजातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
यात्रेदरम्यान शहरातील अनेक रस्त्यांवर वाहतूक वळवण्यात आली. कायदा व सुव्यवस्थेवर लक्ष ठेवण्यासाठी सहायक पोलीस अधीक्षक नयोमी साटम, पोलीस निरीक्षक अजिंक्य तांबडे, उप पोलीस निरीक्षक विनोद जांभळे, हेडकॉन्स्टेबल राजेश वऱ्हाडे, दिलीप सूर यांच्यासह अनेक पोलीस कर्मचारी घटनास्थळी उपस्थित राहून यात्रेवर लक्ष ठेवून होते.
0 comments:
Post a Comment