(प्रशांत गेडाम)सिंदेवाही- सिंदेवाही तालुक्यातील सरडपार येथील कोतवाल नंदकिशोर हिरामण खोब्रागडे वय 46 वर्ष हे दि. 12 पासून बेपत्ता होते, दि.13 ला त्यांचे भाऊ संजय खोब्रागडे यांनी बेपत्ता असल्याची तक्रार पोलीस स्टेशन येथे केली, दि. 14 तारीख ला नंदकिशोर यांच्या कुटुंबांनी संशय आरोपी म्हणून नामदेव धनविजय यांचे नाव घेतले त्यांच्या तक्रारीवरून दि.18 संशय आरोपी म्हणून धनविजय याला पोलिसांनी अटक केली.
... Kotwala's dead body was found in the Uma riverbed
त्यानंतर त्याच्या बयानावरून त्याचा मानसपुत्र सोपान जिल्हारे समुद्रपूर याला अटक केली, त्यांच्या बयानवरून दोघांचाही पी. सी. आर घेतला असता सोपान घटनेतील तिसरा आरोपी प्रशांत कुंभरे वय-25 वर्ष राहणार मुरदपूर दि.21 ला अटक केली असता घटनेचा तपास लागला, प्रशांत संपूर्ण घटना सांगितली. नंदकिशोर ला त्याच्या घरून रेती च्या बहानाने उचलून शिवाजी चौक येथे दारू पाजली, त्यानंतर विरव्हा येथील मुसली धाब्यावर नेऊन नंदकिशोर ला मध्यधुंद केले नंतर मुल येथील उमा नदीच्या काठावर त्याला ढकलून दिले असे त्यांनी सांगितले. दि.22 रविवार ला सकाळपासून मुल येथील उमा नदी जवळ अडीच किमी अंतरावर एका खोडक्याला नंदकिशोर यांचा मृत्यदेह कुजल्या अवस्थेत आढळला, त्यानंतर त्याच्या कुटुंबाला बोलवून त्यांची ओळख पटली. घटनेच्या कलम 140,(३)(५) आरोपी डॉ. धनविजय, सोपान जिल्हारे, प्रशांत कुंभरे, एक फरार गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा पुढील तपास जिल्हा पोलीस अधिक्षक, उप विभागीय पोलीस अधीकारी दिनकर ठोसरे, पोलीस निरीक्षक विजय राठोड, सहाय्यक पोलीस निरीक्षक मेश्राम तपास करीत आहे.
0 comments:
Post a Comment