घाटंजी तालुका प्रतिनिधी :-
महाराष्ट्र राज्य तथा यवतमाळ जिल्ह्यासह व घाटंजी तालुक्यातील शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे अतोनात नुकसान झाले असून आधीच कर्जाच्या गर्तेत असलेला शेतकरी पुन्हा कर्जाच्या दलदलीत फसत जात आहेत.परिणामी शेतकऱ्यांचे आत्महत्येचे प्रमाण दिवसेदिवस वाढत आहे.म्हणून शेतकऱ्यांना या नापिकीच्या काळात दिलासा मिळावा म्हणून महाराष्ट्र राज्यासह यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे सरसकट कर्जमाफी करून शेतकऱ्यांना नवसंजीवनी मिळावी. या करिता तहसीलदार,तहसील कार्यालय घाटंजी जी.यवतमाळ मार्फत शासनाला निवेदन सादर करण्यात आले होते.
The third day of Vanchit Bahujan Aghadi Ghatji's death protest
परंतु शासना कडून त्या निवेदनाला केराची टोपली दाखविली.त्या मुळे शासनाचे लक्ष शेतकऱ्यांच्या समास्ये कडे वेधण्या करीता, शेतकऱ्यांच्या समस्येचे निराकरण होई पर्यंत तालुकाध्यक्ष संघपाल कांबळे यांच्या नेतृत्वाखाली वंचित बहुजन आघाडीचे महासचिव नितीन राठोड हे जिवंत पनी सरणावर बसून मरेपर्यंत दिनांक १९/०९/२०२४ पासून कीन्हीं येथे सरण मरण आंदोलन चालू आहे.आज आंदोलनाचा तिसरा दिवस आहे आंदोलनाच्या लक्षवेधी मागण्या !!१) शेतकऱ्यांची सरसकट कर्ज माफी करण्यात यावी.
२) घाटंजी तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा.
३) कापसाला १२ हजार रुपये प्रति क्विंटल भाव देण्यात यावा.
४) सोयाबीनला ७ हजार रुपये प्रति क्विंटल भाव देण्यात यावा.
५) शेतकऱ्यांना सरसकट पीक विमा देण्यात यावा.
६) शेतकऱ्यांचे थकीत वीजबिल माफ करा.
७) म. रा. वि. वि. कंपनी ला २०२४ पर्यंत पैसे भरणा केलेल्या शेतकऱ्यांना विद्युत जोडनी करण्यात यावी.
८) घाटंजी तालुक्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई म्हणून प्रति हेक्टरी ५० हजार रुपये देण्यात यावे.
0 comments:
Post a Comment