बल्लारपूर:- स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जिवंत काडतूस व अमलीपदार्थ बाळगणाऱ्या दोन आरोपींना मंगळवारी (दि.24) अटक केली आहे. अक्षय बबन माणुसमारे 24 रा. डॉ. झाकीर हुसैन वॉर्ड, बल्लारपूर, राजू गुलाब खोंडे 54 रा. दत्त मंदिर जवळअसे आरोपींची नावे आहेत.
मंगळवारी (दि. 24) स्थानिक गुन्हे शाखेला बल्लारपूरच्या डॉ. झाकीर हुसैन वॉर्डमध्ये एक दुचाकीवरील दोघे व्यक्ती अवैधरित्या अग्निशस्त्र बाळगून अमलीपदार्थांचे सेवन करत असल्याची माहिती मिळाली. या माहितीवरून पथकाने रात्री 10 वाजताच्या सुमारास दुचाकी एमएच 34/ सीजी -2299 क्रमांकाच्या Crime दुचाकीची तपासणी केली. तपासणी दरम्यान, दुचाकीतून दोन जिवंत काडतूस, लायटर, सिल्व्हर रंगाचा गोगो पेपर, अर्धवट जळलेला सिल्व्हर पेपर मिळाल्या. या कारवाईत 71 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपींना अटक करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आळा. ही कारवाई पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलिस अधीक्षक रिना जनबंधू यांचा मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक महेश कोंडावार यांच्या नेतृत्वात स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने केली.
0 comments:
Post a Comment