सादिक थैम वरोरा: वरोरा तालुक्यातीलबांद्रा,मोहबाळा,चारगांव(बु),मालविय वार्ड,अंबादेवी वार्ड ,द्वारकानगरी बोर्डा येथे डाॅ.चेतन खुटेमाटे यांच्या चला बदल घडवूया या संकल्पनेतुन नोटबुक वाटप करण्यात आले. तसेच बांद्रा येथे कै.संजय हक्के यांच्या स्मृर्ती प्रित्यर्थ हनुमान सांस्कृतीक क्रिडा मंडळ बांद्रा, यांच्या सौजन्याने नंदी बैल सजावट स्पर्धा आयोजीत करण्यात आली होती या स्पर्धे मध्ये एकुन २१ बक्षिसांचे वितरण करण्यात आले.या कार्यक्रमाचे अध्यक्ष डाॅ.चेतन खुटेमाटे हे होते.
Under the Let's Change initiative, Tanha Pola was completed.
प्रमुख अतिथी म्हणुन सरपंच बोरगाव (दे)जयाताई चिंचोलकर,अविनाश चिंचोलकर पोलीस पाटील,डाॅ.हिवरे पशु वैद्यकीय अधिकारी,रोशन दडमल उपसरपंच,शंकर काळमेंघे,अध्यक्ष हनुमान सांस्कृतीक क्रिडा मंडळ बांद्रा,सतिश परचाके,चंद्रशेखर झाडे उपस्थित होते.या कार्यक्रमाचे संचालन कु.आचल दडमल आभार प्रदर्शन वैभव चिंचोलकर यांनी केले.या कार्यक्रमाला
यशस्वी करण्यासाठी भाष्कर मगरे,सागर दोहतळे,अक्षय राणे,वैभव कुबडे,सुमित कुबडे,उमेश मगरे,सतिश हक्के,विंटेश हक्के,भाविक गोरघाटे,संतोष दडमल,राहुल दडमल,विशाल सोनेकर,जगदिश चिंचोलकर,स्वप्निल टाले,संकेत गोहोकर,तुषार कडू,विशाल मोरे,मनोज गाठले,प्रफुल सोनेकर यांनी अथक प्रयत्न केले.
0 comments:
Post a Comment