चंद्रपूर : नगरमध्ये रविवारी महंत रामगिरी महाराज यांच्या समर्थनार्थ आणि बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचाराच्या निषेधार्थ सकल हिंदू समाजातर्फे मोर्चाचे आयोजन करण्यात आले. या मोर्च्या दरम्यान, भाजपचे आमदार नितेश राणे यांनी अत्यंत आक्रमक भाषण केले. त्यांनी स्वतःला हिंदू समाजाचा "गब्बर" असल्याचे सांगत मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावना दुखावण्याचे विधान केले. त्यांच्या या वादग्रस्त भाषणावरून चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमिटी आणि अल्पसंख्यांक सेलच्या वतीने चंद्रपूर जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे तक्रार देण्यात आली असून, नितेश राणे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी करण्यात आली आहे.
Home
chandrapur
भाजपचे आमदार नितेश राणे यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणीDemand to file a case against BJP MLA Nitesh Rane and arrest him
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
0 comments:
Post a Comment