भद्रावती तालुका प्रतिनिधि:-देशाच्या कृषीप्रधान संस्कृतीत शेतकरी मित्र सर्जा राजाच्या श्रमाला अनन्य महत्व आहे त्याचा सहकार्यप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सम्पूर्ण भारतात बैल पोळा व तान्हा पोळा नंदी बैल पोळा हा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो या पारंपरिक सणाचा उत्साह वाढविण्यासाठी यंदा बैल पोळ्याच्या व तान्हा पोळा नंदी बैल पोळाच्या दिवशी भद्रावती तालुक्यातील ऐतिहासिक सातवाहनकालिन चंदनखेडा नगरी येथे बैल पोळा व तान्हा पोळा नंदी बैल पोळा सणाचे औचित्य साधून शेतकरी व बालगोपालांचा आनंद द्विगुणित करण्यासाठी महात्मा गांधी तंटामुक्त समिती चंदनखेडा यांच्या वतीने बैल पोळा व तान्हा पोळा नंदी बैल सजावट स्पर्धा दि.२ व ३ सप्टेंबर २०२४ ला चंदनखेडा येथील बसस्थानक परिसरात मोठ्या उत्साहात पार पडली.
Bull Pola and Tana Pola Nandi Bull Decoration Competition concluded at Chandankheda
या स्पर्धेत ७० बैल जोड्या स्पर्धेत सहभागी होत्या.त्यात प्रथम पारितोषिक मारोती नन्नावरे व दुतिय पारितोषिक वसंता भरडे यांना प्राप्त झाले,तर तृतीय पारितोषिक सुनिल जांभुळे तर दुसऱ्या दिवशी ३ ला .तान्हा पोळा नंदी बैल सजावट स्पर्धेत प्रथम क्रमांक आहाना देवगडे,दुत्तिय क्रमांक जुनेद शेख तर तृतीय क्रमांक क्रिश जांभुळे यांना प्राप्त झाले.या स्पर्धेत २०० स्पर्धक सहभागी झाले होते.प्रत्येकास प्रोत्साहन पर शालेय साहित्य देण्यात आले.महात्मा गांधी तंटामुक्त समिती कडुन विजेत्यांना रोख रक्कम व सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.या कार्यक्रमात महात्मा गांधी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष मनोहर शालिक हनवते, सरपंच नयन जांभुळे, पोलिस पाटील समिरखान पठान, माजी उपसरपंच तथा समाजपरिवर्तक विठ्ठलजी हनवते,सिंगलदिप पेन्दाम, सुशिला हनवते , छाया घुगरे, प्रकाश भरडे, प्रशांत कोहळे,यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिके देण्यात आले.बैल पोळा व तान्हा पोळा नंदी बैल सजावट स्पर्धाकांना शौर्य क्रिडा मंडळ व बिरसा मुंडा आदिवासी पुरुष बचत गट चंदनखेडा यांच्याकडून शैक्षणिक साहित्यासह प्रोत्साहन पर साहित्य देण्यात आले.यावेळी शौर्य क्रिडा मंडळाचे अध्यक्ष आशिष हनवते, सचिव स्वप्निल कुळसंगे, राहुल चौधरी,सदस्य राहुल कोसुरकार, शुभम भोस्कर, कुणाल ढोक, प्रविण भरडे, दिलिप ठावरी, अनिकेत बुरेवार, अमोल महागकार,क्रिश कोसुरकार, अनिल हनवते,भुपेश निमजे, पंकज दडमल, निखील वाटेकर, शुभम जांभुळे,प्रज्वल बोढे, यांची उपस्थिती लाभली होती. बिरसा मुंडा आदिवासी पुरुष बचत गटाचे अध्यक्ष अमित नन्नावरे, मंगेश हनवते, गणेश हनवते,मंगेश नन्नावरे,प्रणित हनवते, निखील चौखे,शंकर दडमल,देवा दोडके, व संपूर्ण गावकरी प्रामुख्याने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आशिष हनवते यांनी केले.तर प्रास्ताविक महात्मा गांधी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष मनोहर हनवते यांनी केले.तर उपस्थितांचे आभार बबलु शेख यांनी मानले .
0 comments:
Post a Comment