Ads

1 फेब्रुवारी 2025 नंतर जिल्ह्यातून रेल्वेने होणारी मालवाहतूक रोखणार

चंद्रपूर:गेली अनेक वर्षे बल्लारपूर व चंद्रपूर वरून मुंबई,पुणे ला नियमीत गाडीचा चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिकांचा अधिकार नाकारणाऱ्या रेल्वे विभागाचा 30 सप्टेंबर रोजी धिक्कार केल्यानंतर आज 2 ऑक्टोंबर रोजी गांधी जयंती निमित्त रेल्वे अधिकार जन आंदोलनाची घोषणा करण्यात आली.गांधी चौकातील महात्मा गांधी यांच्या पुतळ्या समोर आंदोलनाचे संयोजक व जनविकास सेनेचे संस्थापक अध्यक्ष पप्पू देशमुख यांनी नारळ फोडून या जनआंदोलनाची घोषणा केली. तीन टप्प्यांमध्ये हे जनआंदोलन करण्यात येईल.
गांधी जयंती निमित्त 2 ऑक्टोबर पासून ते 25 नोव्हेंबर पर्यंत जनजागृती करून जन समर्थन मिळवणे, पत्रव्यवहार करणे, निवेदन देणे अशा पद्धतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दाखवलेल्या मार्गाने पहिल्या टप्प्याचे आंदोलन करण्यात येईल. 26 नोव्हेंबरला संविधान दिनापासून 31 डिसेंबर पर्यंत राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी दाखवलेल्या अहिंसा व शांततेच्या मार्गाने सत्याग्रह, धरणे,उपोषण इत्यादी आंदोलने करण्यात येतील. 1 ते 31 जानेवारी 2025 पर्यंत शहीद भगतसिंग यांच्या क्रांतीच्या मार्गाने आक्रोश मोर्चे,आमदार-खासदार-मंत्र्यांना घेराव अशी आक्रमक आंदोलने करण्यात येतील.
यानंतरही केंद्र सरकारने व रेल्वे विभागाने एक फेब्रुवारीपर्यंत बल्लारपूर -चंद्रपूर ते मुंबई व पुणे ला नियमित रेल्वे गाडीची घोषणा न केल्यास एक फेब्रुवारी 2025 पासून संपूर्ण जिल्ह्यातून जाणारी कोळसा, सिमेंट व लोहखनिजाची वाहतूक रोखण्यात येईल अशी माहिती देशमुख यांनी दिली.
यावेळी राजू काबरा, इमदाद शेख, अक्षय येरगुडे, मनीषा बोबडे, कविता अवथनकर, अरुणा महातळे, ललिता उपरे, नेहा लाबांडे,गोलू दखणे, सतीश घोडमारे,राजेश पेशेट्टीवार, अनिल दहागांवकर, धनंजय तावाडे,हरिभाऊ बिस्वास, कुशाबराव कायरकर, आशिष रामटेके, प्रफुल बैरम, अमोल घोडमारे, इमरान रजा, संदीप कष्टी, निखिल पोटदुखे,अजय महाडोळे, सतीश आकनुलवार, प्रफुल बजाईत, दामोदर मेश्राम, सोनल धोपटे,नंदू लभाने,धवल माकोडे,किशोर महाजन,आकाश माणूसमारे प्रामुख्याने उपस्थित होते.


Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment