Ads

अमोल लोडे वर कठोर कार्यवाही करून फाशीची शिक्षा द्या.

राजुरा:-बदलापूर लैंगिक अत्याचाराच्या घटनेने संपूर्ण राज्य हादरले असताना चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना तालुक्यात देखील ऐका अल्पवयीन विध्यार्थीनिला गुंगीचे औषध देऊन तिच्यावर अत्याचार केल्याची तक्रार नोंदविण्यात आली असून आरोपी शिक्षक अमोल लोडे याला कोरपना पोलिसांनी गजाआड केले.
Amol Lode should be severely punished and sentenced to death.
पीडित मुलगी कोरपना येथील एका इंग्रजी माध्यमाच्या कॉन्व्हेट शाळेतील असून खाजगी शिकवणीच्या नावाखाली बोलावून तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आला. या घटनेच्या निषेधार्थ दि. 3 ऑक्टोबर ला सर्व पक्षीय जाहीर निषेध मोर्चा काढण्यात आला यात काँग्रेस पक्षाचाही सहभाग होता. प्रशासनाने आरोपी अमोल लोडे यांच्यावर कठोरात कठोर कार्यवाही करून त्याला फाशीची शिक्षा द्यावी असे निवेदन कोरपना येथील तहसीलदार, आणि ठाणेदार दारासिंह राजपूत यांना देण्यात आले. या आंदोलनात विजयराव बावणे, काँग्रेस नेते, संचालक चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, उत्तम पेचे, माजी जी. प. सदस्य, संभा कोवे, माजी सभापती, पं. स.कोरपना, सचिन भोयर, मनसे प्रमुख, नंदाताई विजयराव बावणे, नगराध्यक्षा, नगर पंचायत, कोरपना, विनाताई मालेकर, माजी जी. प. सदस्या, डॉ. प्रकाश खनके, तालुका प्रमुख शिवसेना उबाठा, कोरपना, प्रभाकर गेडाम, बी.एस.पी., सुरेश मालेकर, इस्माईल शेख, उप नगराध्यक्ष, न. पं. कोरपना, गणेश गोडे, पुंडलिक गिरसावळे, राजाबाबू, इरफान शेख, नितीन बावणे, मनोहर चन्ने, मोबीन बेग, निसार शेख, मोहम्मद शेख, लक्ष्मण पंधरे आदिसह मोठया संख्येने राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.
---------------------------------------------


विजयराव बावणे, संचालक, चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, काँग्रेस नेते
कोरपना येथे घडलेली घटना अत्यंत निंदनीय व माणुसकीला काळिमा फासणारी असून अश्या घटनेचा आम्ही काँग्रेस च्या वतीने तीव्र निषेध करतो . अमोल लोडे विषयी माहिती मिळताच त्यांना काँग्रेस पक्षाच्या पदावरून व पक्षातून तात्काळ हकालपट्टी करण्यात आली. अशा नराधमाला फाशीची शिक्षा व्हावी करिता आज सर्वपक्षीय निषेध मोर्चात आंदोलनात काँग्रेस पक्षानेही सक्रिय सहभाग घेतला. फास्ट ट्रॅक कोर्टात हे प्रकरण चालविल्या जावे व या आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी चुकीला माफी नाही अशी सक्त भूमिका काँग्रेस पक्षाची असल्याचे मत विजयराव बावणे यांनी व्यक्त केले.

नंदाताई विजयराव बावणे
नगराध्यक्षा, नगर पंचायत, कोरपना
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या शिक्षक अमोल लोडे यांनी केलेले दुषकृत्य माणुसकीला काळिमा फासणारे आहे. काँग्रेस पक्षात अशा नराधमाला अजिबात जागा नाही. काँग्रेसच्या नेत्यांनी त्याची पक्षातून तात्काळ हकालपट्टी केली. महिला व अल्पवयीन मुलींवर होणाऱ्या लैंगिक अत्याचाराचा मी तीव्र शब्दात निषेध व्यक्त करीत असून आजच्या निषेध मोर्चात काँग्रेस पक्षाने सक्रिय सहभाग घेतला आहे. काँग्रेस पक्ष अश्या कृत्यांचं व असे निंदनीय, माणुसकीला काळिमा फासणाऱ्या व्यक्तींचे कधीही समर्थन करणार नाही. अश्या विकृत मानसिकतेच्या व्यक्तींना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे अशी प्रतिक्रिया नंदाताई बावणे, नगराध्यक्षा, नगर पंचायत, कोरपना यांनी दिली आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment