घाटंजी प्रतिनिधी- दिनांक २ आक्टोंबर २०२४ रोज बुधवारी सायंकाळी सहा वाजता राष्ट्रपिता महात्मा गांधी व देशाचे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंती कार्यक्रम सामाजिक एकता मित्र परिवार गृप घाटंजीच्या वतीने जयस्तंभ चौक पोलिस स्टेशन जवळ घाटंजी येथे साजरा करण्यात आला.
In Ghatji Mahatma Gandhi Jayanti Celebrated
सामाजिक एकता मित्र परिवाराच्या वतीने भविष्यात सर्व राष्ट्रीय सन तथा थोर पुरुष ज्यांनी देशासाठी आपले संपूर्ण आयुष्य खर्ची घातले अशा सर्व क्रांतिकारक व सर्व समाज सुधारकांची जयंती साजरी करण्याचे निश्चित केले आहे. जेणेकरून तरूण युवकांना प्रेरणा मिळावी, व गांधीजींच्या स्वप्नातला समृद्ध भारत येणाऱ्या पिढ्यांना पहाता यावा, त्याचा एक भाग म्हणून जयंती साजरी केली आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष गजेंद्र ढवळे सर.प्रमुख पाहुणे नामपिल्लेवार सर, बोपटे सर, नगराळे सर, अँड संदीप माटे, मोरेश्वर वातीले उपस्थित होते. मान्यवरांनी महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांचे जिवन कार्यावर मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन होमदेव किनाके व आभार प्रदर्शन मोरेश्वर वातीले यांनी केले व कार्यक्रमाचे नियोजन पांडुरंगजी किरणापुरे यांनी केले, कार्यक्रमाला सामाजिक एकता मित्र परिवार चे व राष्ट्र निर्माण विचारधारा गृप घाटंजीचे सर्व सभासद उपस्थित होते.
0 comments:
Post a Comment