जावेद शेख तालुका प्रतिनिधी( भद्रावती):- 'चला बदल घडवूया या' मोहिमेअंतर्गत गुरुदृष्टी नेत्रालय तर्फे तथा लहान हनुमान उत्सव समिती व विंजासन ग्रामवासी यांच्या सौजन्याने आज दिनांक 4 ऑक्टोबरला सकाळी 11 ते 3 या वेळात येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मोफत डोळे तपासणी , चष्मे वाटप व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
Free eye checkup, glasses distribution and blood donation camp at Vijayasan today.
या कार्यक्रमाचे उदघाटन मुख्याध्यापिका अनिता पेंदाम यांच्या शुभहस्ते, विदर्भातील प्रसिद्ध नेतृत्व डॉक्टर चेतन खुटेमाटे यांच्या अध्यक्षतेत होणार असून प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. रमेश मिलमिले,डॉ. कमलेश वैरागडे, सहाय्यक अभियंता जयप्रकाश लोणगाडगे, डॉ. शंकर ठावरी, डॉ. अनंता मत्ते आदींची उपस्थिती राहणार असून या शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन आयोजका तर्फे करण्यात आले आहे.
0 comments:
Post a Comment