भद्रावती तालुका प्रतिनिधि- जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ढोरवासा येथे 02 आक्टोबर 2024 ला शाळा ढोरवासा येथे महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांची जयंती प्रित्यर्थ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. ढोरवासा ग्रामस्थ यांचे तर्फे दानशूर व्यक्ती कडून शाळा ढोरवासा ला संत आणि थोर महापुरुषांचे 30 फोटो सप्रेम भेट देण्यात आले.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे उपासक आदरणीय गुणवंत भाऊ यांनी उपस्थित राहून विविध दाखले देऊन व छोट्या कथा सांगून स्वभाव व संस्कार यांतील फरक उपस्थितांना सोप्या प्रकारे समजावून दिले.
कार्यक्रमाला उपस्थित सर्वांनी स्वच्छता आणि पर्यावरण यावर शपथ घेऊन भविष्यात मानवजातीला याचा परिणाम किती घातक आहे याची वेळीच दखल घेतली तर पुढे परिणाम होणार नाही या जागतिकीकरण च्या युगामध्ये क्रांक्रीटचे जंगल बनत आहे भविष्यात मानवजातीकरीता ऑक्सिजन बॉर उघडण्याची गरज पडू नये याकरीता सर्वांनी सतर्क राहून प्रत्येकांनी पर्यावरणाची जोपासना करणे गरजेचे आहे असे मत व्यक्त केले.
अंधश्रद्धा हा मानवाला लागलेला कलंक आहे यांचे सुध्दा सुंदर दाखले देऊन सर्व उपस्थितांना मार्गदर्शन केले.
दिनांक 17 सप्टेंबर ते 2 आक्टोबर पर्यंत शाळा स्तरावर विद्यार्थ्यांच्या स्पर्धा झाल्या त्या सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य बक्षिस मान्यवरांचे हस्ते देण्यात आले. सर्वं उपस्थितांना श्री पंढरी पाटील वरखडे यांच्या कडुन एक ग्लास दूध देण्यात आले.
सर्व विद्यार्थ्यांना ओळखपत्राचे वितरणाचा करण्यात आले.
दानशूर व्यक्तीना शाळेतर्फे शाल व पुष्पगुच्छ देऊन सर्वांचा सत्कार करण्यात आला
केंद्रप्रमुख गायकवाड सर यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाकरीता गेडाम सर, गाडगे सर. कोडापे मॅडम यांनी अथक प्रयत्न केले संचलन कोडापे मॅडम आणि आभार गेडाम सर यांनी केले
0 comments:
Post a Comment