जावेद शेख भद्रावती:- घरातील व्यक्ती गाढ झोपेत असल्याची संधी साधून अज्ञात चोरट्यांनी घरातील बॅग मधील 50 हजार रुपये लांबविले.
सदर घटना शहरातील संताजी नगर येथे दिनांक 20 रोज रविवारला सकाळी सहा वाजता उघडकीस आली. याबाबत पोलिसात तक्रार करण्यात आली असून भद्रावती पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून श्वानपथक व फॅरेंन्सीक पथकाच्या मदतीने ते अज्ञात चोरट्यांचा शोध घेत आहे.संताजी नगर येथे अमोल वरभे यांच्या घरी किरायाने रहात असलेले रफिक हुसेन शेख यांचे कुटुंब गाढ झोपेत असताना अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश केला व बॅग मधील 50 हजारा ची रक्कम लांबवली. त्यानंतर चोरट्यांनी आलमारीतील सामान काही वस्तू मिळेल या आशेने अस्ताव्यस्त केले मात्र अन्य वस्तू त्यांच्या हाती लागल्या नाही. सध्या भद्रावती परिसरात चोरीच्या घटनांत मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून याआधी झालेल्या चोऱ्यांचा तपास लावण्यात भद्रावती पोलिसांना अपयश आले आहे. त्यामुळे त्यांच्या कार्यप्रणालीवर शंका निर्माण होत आहे. सदर घटनेचा तपास भद्रावती पोलीस करीत आहे.
0 comments:
Post a Comment