(प्रशांत गेडाम)सिंदेवाही- पोलीस स्टेशन सिंदेवाही ला दिनांक 15 ऑक्टोबर 2024 रोजी महिला फिर्यादी राहणार नाचनभट्टी ता. सिंदेवाही यांनी सिंदेवाही पोलिसात येऊन तोंडी रिपोर्ट दिली की दिनांक 14 ऑक्टो 2024 रोजी दुपारी 1-30 वाजता दरम्यान शेतात मजुरीचे काम करायला गेली असता आरोपी दीपक भाऊराव बनकर वय-52 वर्ष राहणार नाचणभट्टी तालुका सिंदेवाही याने मागून येऊन ( फिर्यादी ) सदर महीलेचा हात पकडला अशा सिंदेवाही पोलीसात दिलेल्या तक्रारीवरून सिंदेवाही पोलिसांनी गुन्हा नोंद करत अप. क्र 385/2024 अन्वये भारतीय न्याय संहिता सोबत अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध कायदा अन्वये गुन्हा नोंद करून तपासात घेतला.
Accused of molesting woman arrested and jailed
सदरचा तपास मा. उपविभागीय पोलीस अधिकारी ब्रह्मपुरी यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक राठोड हे करत आहेत. सदरच्या गुन्ह्यातील आरोपी नावे दीपक भाऊराव बनकर वय-52 राहणार नाचण भट्टी तालुका सिंदेवाही, आरोपीलाआज न्यायालयात हजर केले असता न्यायाधीशाने तुरुंगवासाचे शिक्षा सुनावली. सदर आरोपीला जिल्हा तुरुंगात पाठवले आहे अशी माहिती सिंदेवाही पोलीस निरीक्षक विजय राठोड यांनी दिली.
0 comments:
Post a Comment