वरोरा: महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चंद्रपूर जिल्ह्यात आज नामांकन अर्ज दाखल करण्याच्या तिसऱ्या दिवशी एकूण सात उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले. जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघांमध्ये निवडणुकीच्या रणधुमाळीत उमेदवारांची संख्या वाढत असून, विविध पक्ष आणि अपक्ष उमेदवार निवडणुकीत आपले नशीब आजमावत आहेत.
प्रवीण सुरेश काकडे यांनी वरोरा विधानसभा मतदारसंघात काँग्रेसकडून अर्ज दाखल केला आहे, जरी त्यांच्या उमेदवारीची अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही. काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता असल्याने काकडे यांनी पक्षाच्या आदेशानुसार अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे काकडे यांच्या उमेदवारीसाठी पक्ष अधिकृत घोषणा कधी करतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
0 comments:
Post a Comment