(प्रशांत गेडाम)सिंदेवाही :- आज दि. 24.10.2024 रोजी सिंदेवाही वनपरिक्षेत्रातील उपक्षेत्र नवरगांव, अंतर्गत नवरगांव-1 नियतक्षेत्रात गस्त करीत असतांना मौजा अंतरगांव खाजगी गट क्र. 191 व 192 चे मधोमध असलेल्या शेतातील पाण्याच्या पाटामध्ये बिबट मृत अवस्थेत असल्याची माहिती वनविभागाला मिळताच विशाल सालकर वन परिक्षेत्र अधिकारी सिंदेवाही हे वनकर्मचारी व RRU चमु सिंदेवाही यांना घेवून मोकास्थळी पोहचले.
A female leopard was found dead in Sindewahi forest area
व मोक्का पंचनामा केला घटनास्थळावर 1 बिबट (मादी) वय अंदाजे 3 ते 4 वर्ष. मृत अवस्थेत पडून असल्याचे आढळले. त्यानंतर घटनास्थळावर मा. श्री. एम. बि. चोपडे, सहायक वनसंरक्षक, (प्रादे. व वन्यजीव) ब्रम्हपुरी वनविभाग, ब्रम्हपुरी, श्री. विवेक करंबेकर, मानद वन्यजीव रक्षक ब्रम्हपुरी वनविभाग व प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) यांचे प्रतिनिधी, श्री. यश कायरकर, NGO प्रतिनिधी (स्वॉब नेचर केअर फाउन्डेशन), डॉ. बजरंग मुर्लीधर सावरे, पशुधन विकास अधिकारी, पेटगांव, डॉ. शालिनी लोंढे, पशुधन विकास अधिकारी, सिंदेवाही हे हजर झाले. त्यांनी मृत बिबटचे निरिक्षण केले. सदर बिबट्याचे सर्व अवयव शाबुत असल्याची खात्री केली. तसेच मृत बिबट व मोक्यावरील परिस्थिती ची पाहणी केल्यानंतर वाघाचे व बिबट्याचे पाउलखुनाचे ठसे आढळून आले. त्यामुळे, सदर बिबटचे मृत्यू झुंजीत झाले असावे, असा प्राथमीक अंदाज पशुचिकीत्सक यांनी वर्तवीला.
वरिष्ठांच्या आदेशान्वये मृत बिबट मध्यवर्ती काष्ट भांडार, सिंदेवाही येथे दुपारी 01.00 वाजता पशुचिकित्सक यांनी सदर बिबट्याचे शवविच्छेदन झाल्यानंतर वरिल सर्व अधिकारी व पंचासमक्ष मृत मादा बिबट ला जाळण्यात आले.
सदर विसरा नमुने उत्तरिय तपासणी करीता प्रयोगशाळेत पाठविण्यात येणार असुन, उत्तरिय तपासणीचा अहवाल आल्यानंतर व पशुवैद्यकीय अधिकारी, यांचे शवविच्छेदन अहवाल प्राप्त झालेनंतर मृत्यूचे खरे कारण स्पष्ट होईल. मात्र प्राथमिक अंदाज व मृत मादा बिबट चे पाठीवरील व मानेवरील दातांचे घाव व पंज्याचे घाव यावरून वाघाच्या हल्ल्यातच या बिबट्याचे मृत्यू झाला असल्याचे प्राथमिक अंदाज आहे.
0 comments:
Post a Comment