वरोरा :-वरोरा तालुक्यातील नागरी, माढेळी, खंबाडा रस्त्याची प्रचंड दुरावस्था झालेली असून सप्टेंबर 2021 मध्ये रस्त्यावर रस्त्यावर तयार झालेल्या स्विमिंग पूल मध्ये पोहून प्रशासनाचे लक्ष वेधन्या करीता सामाजिक कार्यकर्ता डॉ. मनोज तेलंग ह्यांनी केले. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ह्या आंदोलनाची दखल घेऊन तात्काळ हिंगणघाट ते अल्लीपूर 40 किमी, हिंगणघाट ते माढेळी 40 किमी हिंगणघाट ते खडसंगी 40 किमी अशा 120 किमी रस्त्यासाठी 192 कोटी रुपयाच्या तरतुदी सहित मंजुरी दिली आणि विधानसभे सहित संसदेत गा जलेल्या ह्या आंदोलनाला न्याय दिला.
सगळीकडून कामाला सुरुवात झाली. नागरी येथील रेल्वेस्थानक परिसरात 2022 मध्ये तत्कालीन आमदार प्रतिभा धानोरकर ह्यांनी भूमिपूजन केले मात्र आजपर्यंत एक टोपलंभर सुद्धा गिट्टी त्याठिकाणी पडली नाही. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत संपूर्ण निरवाचन क्षेत्रातुन त्यांना प्रचंड मताधिक्य प्राप्त झालं मात्र नागरी, माढेळी जी. प. भागातून त्या पिछाडीवर होत्या याचाच राग म्हणून त्यांनी नागरी गावातील मंजूर झालेला प्रभातफेरी रोड सुद्धा रद्द केला. आता होऊ घातलेल्या विधानसभा निवडणूकीवर बहिष्कार टाकायचा की विद्यमान राज्यकर्त्यांना मतदान रुपी विरोध करायचा यावर परिसरातील अनेक नागरिक आणि सामाजिक कार्यकर्यांनी आपापल्या गावात बैठका घेऊन लोकवर्गणीतुन ह्या भागातून डॉ. मनोज तेलंग ह्यांना उमेदवारी दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. एक आंदोलन म्हणून ह्या मुजोर राज्यकर्त्यांना धडा शिकवण्याचा नागरी गावातील ग्रामस्थना आता कसा प्रतिसाद मिळतो याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.
0 comments:
Post a Comment