Ads

किशोर जोरगेवार व डाॅ रमेशकुमार गजभे यांच्या प्रवेशाने जिल्ह्यात भाजप संघटन प्रबळ - हंसराज अहीर 

चंद्रपूर - भारतीय जनता पार्टीमध्ये विद्यमान आमदार किशोर जोरगेवार व राज्याचे माजी राज्यमंत्री तथा माना समाजाचे दिग्गज नेते डाॅ. रमेशकुमार गजभे यांची घरवापसी झाल्याने पक्षाची राजकीय ताकद शतपटीने वाढली असून या प्रवेशामुळे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये भाजपाला पुनर्वैभव प्राप्त होईल असा विश्वास पुर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी व्यक्त केला.
जिल्ह्यात भाजपाचे प्रबळ संघटन अस्तित्वात असून जोरगेवार व गजभे या लोकप्रिय नेत्यांच्या भाजप प्रवेशामुळे चंद्रपूर, वरोरा, चिमुर सह संपुर्ण जिल्ह्यातील विधानसभा क्षेत्रांमध्ये पक्षाला मोठ्या प्रमाणात जनाधार लाभणार असून भाजपा या प्रवेशाने पुन्हा संघटनात्मकदृष्ट्या मजबुत होईल असेही हंसराज अहीर यांनी म्हटले आहे.

By Kishore Jorgewar and Dr. Ramesh Kumar Gajbhe
BJP organization dominant in the district with entry - Hansraj Ahir
भाजपामध्ये प्रवेश करणारे किशोर जोरगेवार हे महायुतीचे चंदपूर विधानसभा क्षेत्रातील अधिकृत उमेदवार असल्यामुळे त्यांच्या प्रवेशाने अनुसुचित जाती वर्ग भाजपाप्रती अनुकुल राहील तसेच डाॅ. गजभे यांच्या राजकीय क्षेत्रातील गाढा अनुभव व अनुसुचित जमाती प्रवर्गात प्रभाव राखणाऱ्या या नेत्याचा निवडणुकीत मोठा लाभ होईल असे सांगत सर्व समाजामध्ये असलेला उभयतांचा प्रभाव दखलपात्र ठरेल असा आशावादही हंसराज अहीर यांनी व्यक्त केला असून या दोन्ही नेत्यांच्या भाजप प्रवेशाचे त्यांनी स्वागत केले आहे.

Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment