Ads

मेडीकल कॉलेज मागील झुडपी जंगालामधील जुगार अडयावर धाड ; ०७ आरोपी ताब्यात

चंद्रपुर :-दि.१८/१०/२०२४ रोजी पोलीस अधिक्षक, मुम्मका सुर्दशन यांनी चंद्रपुर शहरात जुगार, प्रोव्हीशन रेड तसेच अवैध धंदयावर कारवाई करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांना दिले. पो. नि. महेश कोंडावार, स्थागुशा, चंद्रपुर यांचे मार्गदर्शनात पोउपनि विनोद भुरले, पोउपनि सामलवार व पोलीस स्टॉफ असे पोलीस स्टेशन, रामनगर परिसरात पेट्रोलींग करीत असतांना मुखबिरव्दारे खबर मिळाली की, अष्टभुजा वार्ड, मेडीकल कॉलेज मागील झुडपी जंगलामध्ये काही इसम ५२ तास पत्यावर पैश्याची बाजी लावुन कट पत्याचा जुगाराचा खेळ खेळीत आहेत
Gambling Den raided in bush forest behind Medical College; 07 accused in custody
अशा खबरे वरून पंचा समक्ष छापा टाकुन ०७ आरोपीतांना ताब्यात घेवुन त्यांचकडुन जुगार साहित्या व नगदी असा एकुण २९,२००/- रूपयाचा माल जप्त करून नमुद आरोपीतांना विरूध्द पोलीस स्टेशन, रामनगर येथे जुगाराचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सदर कार्यवाही पोलीस अधिक्षक मुम्मका सुदर्शन साहेब चंद्रपुर, अपर पोलीस अधिक्षक रिना जनबंधु मॅडम, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांचे नेतृत्वात पोउपनि विनोद भुरले, पोउपनि मधुकर सामलवार, पोहवा/किशोर वैरागडे, पोहवा/रजनिकांत पुठ्ठावार, पोहवा/सतिश अवथरे, नापोशि/संतोष येलपुरलवार, पोशि/गोपाल आतकुलवार, पोशि/गोपीनाथ नरोटे, चापोशि/मिलींद टेकाम सर्व स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर येथील अधिकारी व कर्मचारी यांनी केली आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment