भोयगाव:- कोरपना तालुक्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या भोयगाव येतील शेतकरी प्रशांत तेलंग यांच्या मृत्यू.
वृत्त असे की प्रशांत तेलंग यांचा मुख्य व्यवसाय शेती हा असून त्यांनी आपले पूर्ण आयुष्य शेती व्यवसायात घातले होते परंतु 16 ॲक्टोबर ला आपल्या शेतामध्ये सकाळला तणनाशक फवारणी करण्याकरिता गेले असताना व स्प्रे करीत असताना घामाद्वारे व स्वासाद्वारे तणनाशक औषीद शरीरात गेल्याने सायंकाळी 3 वाजता त्यांना नाहक त्रास होऊ लागला. गावातील काही पुरुष मंडळी व नातेवाईकांना कळताच त्यांना तात्काळ चंद्रपूर येतील सरकारी रुग्णालय येते नेण्यात आले. परंतु उपच्यारा दरम्यान 16 ॲक्टोबर ला सायंकाळी 5 वाजता त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यू कारणाने भोयगाव येते शोककळा पसरली असून कुटुंबावर दुःखाचे डोंगर कोसळले आहे त्यांच्या मृत्यू पच्यात पत्नी व दोन मुली असा बराच मोठा आप्त परिवार असून भोयगाव येथील स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यविधीचा कार्यक्रम पार पडला आहे.
0 comments:
Post a Comment