(प्रशांत गेडाम)सिंदेवाही- ब्रह्मपुरी वन विभाग ब्रह्मपुरी अंतर्गत येणाऱ्या सिंदेवाही वनपरिक्षेत्रातील व सिंदेवाही राऊंड मधील डोंगरगाव बीट, राखिव वन कक्ष क्रमांक 252 येथे गेलेल्या डोंगरगाव ता.सिंदेवाही येथील विलास तुळशीराम मडावी वय -47 याला वाघाने ठार केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली.
घटनेची माहिती मिळताच तात्काळ सिंदेवाही पोलीस कर्मचारी आणि सिंदेवाही वनपरिक्षेत्र अधिकारी विशाल सालकर यांच्यासोबत संपूर्ण वन कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. मोक्का पंचनामा करून मृतदेह विच्छेदनाकरिता सिंदेवाही येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये पाठविण्यात आले.
0 comments:
Post a Comment