चंद्रपुर :-आज दि.१८/१०/२०२४ रोजी सकाळी मा. पोलीस अधिक्षक साहेब, चंद्रपुर यांचे आदेशान्वये विधानसभा निवडणुक - २०२४ चे आदर्श आचारसंहितेच्या अनुषंगाने चंद्रपुर जिल्हयात दारूबंदी, जुगार प्रतिबंध, प्रतिबंधीत सुगंधीत तंबाखु तसेच इतर अवैध धंदयावर कार्यवाही करणेकामी पोलीस स्टेशन सावली परिसरात स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर येथील अधिकारी व अंमलदार पेट्रोलींग करीत असतांना गुप्तबातमीदार यांचेकडुन माहिती मिळाली की, एक पांढरे रंगाचा आयसर कंमाक सीजी-०७ सीक्यु ४६०२ मधुन महाराष्ट्रामध्ये प्रतिबंधीत असलेला सुगंधित तम्बाकु व पानमसाला या अन्नपदार्थाच्या विक्रीकरीता गडचिरोली ते चंद्रपूर अशी अवैद्यरित्या वाहतुक करणार आहे,
Truck loaded with smuggled flavored tobacco worth Rs 35 lakh seized in Maharashtra
अशी खात्रीशीर खबर मिळाल्याने विधानसभा निवडणुक -२०२४ एसएसटी चेक पोस्ट व्याहाड (बुज) ता. सावली येथे भगत, उपविभागीय पोलीस अधिकारी, मुल, महेश कोंडावार पोलीस निरीक्षक, सपोनि दिपक कांकेडवार, पोउपनि संतोष निंभोरकर, पोहवा/चेतन गज्जलवार, पोहवा/नितेश महात्मे, पोअं/किशोर वाकाटे, पोअं/अमोल सावे, पोअं/प्रफुल गारघाटे, पोअं/प्रमोद डंबारे स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर यांनी राज्य उत्पादन शुल्क, चंद्रपूर येथील कर्मचारी यांचेसह नाकाबंदी करून नमुद वाहन चेक केले असता त्यामध्ये लोखंडी तारेच्या बंडल खाली लपवुन ठेवलेला महाराष्ट्रामध्ये प्रतिबंधीत असलेला मजा १०८ सुंगधित हुक्का शिशा तंबाखूचे २०० ग्रॅम वजनाचे १६८० बॉक्स, ५० ग्रॅम वजनाचे १८०० बॉक्स एकुण कि. १९,९३,८००/- रू व जप्त वाहन कि. १५,०००,०००/-रू असा एकुण ३४,९३,८००/- रू चा माल पंचनामा कार्यवाही करून जप्त करण्यात आला आहे. जप्त वाहनाचे चालक १) इरफान कुरेशी मुस्तफा कुरेशी, वय २७ वर्ष, रा. इस्लामनगर वॉर्ड नं.४, सुफेला, ता. भिलाई, जि. दुर्ग, छत्तीसगड, २) संतोष कुमार सुंदर सिंह, वय ४७ वर्षे रा.पयली, ता. शहपुरा, जि.डिंडोरी, मध्यप्रदेश यांचेविरूध्द सरकारतर्फ पोउपनि संतोष निंभोरकर यांनी दिलेल्या रिपोर्टवरून पोलीस स्टेशन सावली येथे गु.र.नं - २३३/२०२४ कलम ३०(२) (अ),२६ (२) (i),२६ (२) (iv), ५९ अन्न सुरक्षा आणि मानके अधि.२००६, सहकलम २२३,२७५,१२३ भा.न्या.सं अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास सपोनि दिपक कांकेडवार, स्था.गु.शा चंद्रपूर हे करीत आहे.सदरची कार्यवाही सुदर्शन मुमक्का पोलीस अधिक्षक चंद्रपूर, श्रीमती रिना जनबंधु अपर पोलीस अधिक्षक चंद्रपूर, भगत उपविभागीय पोलीस अधिकारी मुल यांचे मार्गदर्शनात महेश कोंडावार पोलीस निरीक्षक स्था.गु.शा चंद्रपूर, सपोनि दिपक कांकेडवार, पोउपनि संतोष निंभोरकर, पोहवा/चेतन गज्जलवार, पोहवा/नितेश महात्मे, पोअं/किशोर वाकाटे, पोअं/अमोल सावे, पोअं/प्रफुल गारघाटे, पोअं/प्रमोद डंबारे सर्व स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर यांनी कारवाई केली आहे.
0 comments:
Post a Comment