जावेद शेख भद्रावती :-तालुक्यातील घोडपेठ गावालगत असलेल्या रेल्वे लाईन जवळ एका 30 ते 35 वर्षीय अज्ञात इसमाचा मृतदेह दिनांक 17 रोज ला आढळून आला.
Unknown Man killed in railway accident.
सदर इसमाचा मृत्यू हा रेल्वेच्या धडकेने झाल्याचा अंदाज असून या इसमाची ओळख अद्याप पटलेली नाही. सदर इसम हा अंदाजे 30 ते 35 वर्षे वयाचा असून उंची पाच फूट सहा इंच आहे. त्याने काळ्या रंगाचा फुलपॅट परिधान केला असून त्याचे अंगावर शर्ट नाही. ज्यांना या इसमाची माहिती असेल त्यांनी जवळच्या पोलीस स्टेशनची फोन नंबर 07175/265093वर संपर्क साधावा असे आवाहन पोलीस विभागाकडून करण्यात आले आहे.
0 comments:
Post a Comment