जिवती :-तालुक्यातील कोदेपूर येथील नावाजलेल्या स्व. सांगाडा पाटील माध्यमिक आश्रमशाळेमध्ये इयत्ता बारावीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याने शाळेतच गळफास लावून आत्महत्या केली.ही घटना शनिवारी (दि. 5) दुपारच्या सुमारास घडली. मंगेश जलपती आत्राम (18) असे आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थ्यांचे नाव आहे. आश्रमशाळेच्या भोंगळ कारभारामुळे मुलाने आत्महत्या केल्याचा आरोप करीत पालकांनी आक्रमक भूमिका घेतलेली आहे.
Student commits suicide by hanging himself in school
कोदेपूर येथील आश्रमशाळेत दुपारच्या सुमारास मंगेशने आश्रमशाळेतच गळफास घेतला. ही बाब लक्षात येताच शिक्षकांसह विद्यार्थ्यांनी त्या खोलीकडे धाव घेऊन विद्यार्थ्यांचे प्राण वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र तत्पूर्वीच विद्यार्थ्यांची प्राणज्योत विद्यार्थ्यांचा बळी गेल्याचा आरोप मालवली होती. कोदेपूर येथील सांगाडा पालकांनी केला आहे. तालुक्यात
पाटील माध्यमिक आश्रमशाळेमध्ये जिवती तालुक्यासह परिसरातील विद्यार्थी निवासी राहून शिक्षण घेत असतात. परंतु संस्थाचालक, मुख्याध्यापक आणि वसतिगृहाच्या अधीक्षकांच्या भोंगळ कारभारामुळे आज एका निरपराध विद्यार्थ्यांचा बळी गेल्याचा आरोप पालकांनी केला आहे
संस्थाचालक, मुख्याध्यापक तसेच वसतिगृहाचे अधीक्षकांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्याची मागणी पालकांनी केली आहे. घटनेची माहिती मिळताच जिवती पोलिसांनी आश्रमशाळा गाठून कायदेशीर प्रक्रिया सुरू केली. मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी गडचांदूर येथे पाठविला आहे.
मुख्याध्यापक, संस्थाचालकांचे दुर्लक्ष
शाळेच्या वसतिगृहाचे अधीक्षक दोन दिवसांपासून रजेवर असून त्यांनी आपला पदभार इतर कुणाकडेही सोपविलेला नसल्याची माहिती प्राप्त झाली. आश्रमशाळेचे अधीक्षक मनमानी पद्धतीने कारभार करतात. शाळेचे मुख्याध्यापक तसेच संस्थाचालक मूकदर्शक बनून असल्यामुळे विद्यार्थ्यांची सुरक्षा ऐरणीवर आली आहे. याचाच परिणाम म्हणून होतकरू आदिवासी विद्यार्थ्याने गळफास लावून आत्महत्या केली
विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. तसेच विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचे चित्र असल्याने संस्थाचालक, मुख्याध्यापक तसेच अधीक्षकांवर गुन्ह्याची नोंद करून त्यांना तत्काळ अटक करावी, अन्यथा मागणी पूर्ण न झाल्यास शाळेच्या आवारातच विद्यार्थ्यांचा मृतदेह ठेवून आंदोलन करण्यात येईल. - गजानन पाटील जुमनाके, अध्यक्ष राजुरा विधानसभा, गोंडवाना गणतंत्र पार्टी.
0 comments:
Post a Comment