Ads

ईश्वरी सत्तेपुढे इलाज नाही - उपमुख्यमंत्री अजित पवार

चंद्रपुर :-अम्मांच्या निधनाची बातमी समजताच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शोकसंवेदना व्यक्त केली असून, "ईश्वरी सत्तेपुढे इलाज नाही" या शब्दांत दु:ख व्यक्त केले आहे. अम्मांचे आज सकाळी निधन झाले असून, उद्या सकाळी 9 वाजता बिनबा गेट येथील शांतीधाम येथे अंत्यविधी पार पडणार आहे.
There is no cure before divine power - Deputy Chief Minister Ajit Pawar
आमदार किशोर जोरगेवार यांच्या मातोश्री गंगुबाई उर्फ अम्मा यांचे दीर्घ आजाराने आज रविवारी सकाळी निधन झाले. त्यांच्या निधनाची वार्ता पसरताच नागरिकांनी त्यांचे अंतिम दर्शन घेण्यासाठी राजमाता निवासस्थानी मोठी गर्दी केली. अनेकांनी शोकसंदेशातून आपल्या भावना व्यक्त करत अम्मांना आदरांजली अर्पण केली. दरम्यान, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही पत्राद्वारे शोकसंवेदना व्यक्त करत अम्मांना आदरांजली अर्पण केली आहे.

"अम्मांच्या निधनाची वार्ता ऐकून अतिशय वाईट वाटले, परंतु ईश्वरी सत्तेपुढे इलाज नाही. त्यांच्या आत्म्यास सद्गती मिळो. आम्ही आपल्या दु:खात सहभागी आहोत," असे अजित पवार यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे

अम्मा का टिफिनच्या प्रणेत्या, निराधारांचा आधार कायमचा हरपला - अजय जयस्वाल

आमदार किशोर जोरगेवार यांच्या मातोश्री अम्मा यांच्या निधनाची बातमी मनाला चटका लावणारी आहे. सेवाभावी वृत्ती असलेल्या अम्मांचा सहवास नेहमीच मला लाभला. प्रामाणिकता आणि कष्ट हेच अम्मांचे जीवनमंत्र होते. "अम्मा का टिफिन" या उपक्रमाच्या त्या प्रणेत्या होत्या, ज्यातून अनेक निराधारांना आधार मिळाला. आज त्यांच्या निधनाने निराधारांचा खरा आधार कायमचा हरपल्याची भावना लोटरी क्लबचे माजी अध्यक्ष तथा श्री महाकाली माता महोत्सव ट्रस्टचे सचिव अजय जयस्वाल यांनी आपल्या शोकसंदेशातून व्यक्त केली आहे.

अम्मांच्या नावाने सुरू असलेले अनेक सामाजिक उपक्रम समाजात सेवेचे कार्य करत होते. "अम्मा की दुकान" या उपक्रमातूनही त्यांनी गरजूंच्या सेवेसाठी योगदान दिले. नेहमी हसत, विचारपूस करणाऱ्या अम्मा आज आपल्यात नाहीत, यावर अजूनही विश्वास बसत नाही. त्यांच्या अशा अचानक जाण्याने अनेकांचे मातृतुल्य छत्र हरपले आहे, आणि कधीही न भरून निघणारी मोठी हानी सामाजिक क्षेत्राची झाली आहे.

निराधारांचे मातृतुल्य छत्र कायमचे हरपले - श्याम धोपटे

अम्माच्या निधनाची बातमी मन सुन्न करणारी आहे. नागपूर येथील रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांची तब्येत सुधारत होती, आणि मी त्यांच्या प्रकृतीची नियमित विचारपूस करत असे. मात्र आज सकाळी अचानक त्यांच्या निधनाची वार्ता आली आणि मन सुन्न झाले. त्यांच्या जाण्याने अनेक निराधारांचे मातृतुल्य छत्र कायमचे हरपल्याचे श्याम धोपटे यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.

अनेक कार्यक्रमांमध्ये अम्मांना भेटण्याचा योग आला. त्यांच्या विचारांनी मी प्रेरित झालो. ‘‘काम करायला लाज कसली?‘‘ असे म्हणत त्यांनी स्वतःच्या टोपल्या विकण्याच्या कामाबाबत चर्चा केली होती. ‘‘बेमानीने कमावलेल्या पैशाने संपन्नता मिळवू शकता, मात्र समाधान केवळ प्रामाणिकतेतून मिळते,‘‘ हे अम्मांचे शब्द कायम मार्गदर्शन करणारे होते. त्यांना भजनाची आवड होती, त्यामुळे भेट झाली की ‘‘तुझे भजन कुठंय?’’ असे त्या आवर्जून विचारायच्या. त्यांच्या "अम्मा का टिफिन" उपक्रमामुळे अनेकांना आधार मिळाला आहे, आणि तो राज्यासाठी प्रेरणादायी ठरला आहे. आज त्या आपल्यात नाहीत, मात्र त्यांचा कष्ट आणि प्रामाणिकतेचा विचार सदैव मार्गदर्शक ठरेल, असे श्याम धोपटे यांनी आपल्या शोकसंदेशातून म्हटले आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment