जावेद शेख भद्रावती:-प्रचाराच्या शेवटच्या दिवशी भद्रावती-वरोरा विधानसभा क्षेत्रातील अनेक उमेदवारांनी रॅली तथा प्रचार सभांच्या सहाय्याने शक्ती प्रदर्शन केले.आज संध्याकाळ पासून क्षेत्रातील प्रचार तोफा थंडावणार असून शेवटच्या दिवशी शहरातील बाळासाहेब ठाकरे प्रवेशद्वारापासून शिवसेना उभाठा गटाचे बंडखोर उमेदवार मुकेश जीवतोडे यांनी विशाल रॅली काढीत आपले शक्ती प्रदर्शन केले.
Shiv Sena rebel candidate Mukesh Jeevtode holds a grand campaign rally in Bhadravati.
सदर रॅली बाळासाहेब ठाकरे प्रवेशद्वारापासून निघाल्यानंतर ती शहरातील मुख्य रस्त्याने फिरुन प्रारंभी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या,छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तथा महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून पूजन करण्यात आले व नंतर रॅली भद्रनाग मंदिराच्या प्रांगणात पोहोचल्यानंतर सदर प्रचार रॅलीची सांगता करण्यात आली. सदर रॅलीत उमेदवार मुकेश जीवतोडे, भद्रावती नगर परिषदेचे माजी उपाध्यक्ष प्रफुल चटकी, आदिवासी नेते रमेश मेश्राम,महेश जीवतोडे,राजू सारंगधर आदी सहभागी झाले होते.
0 comments:
Post a Comment