चंद्रपूर : मध्यचांदा वनविभागाचे चिवंडा वनपरिक्षेत्रात कक्ष क्र.१३८ मध्ये वाघाचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. मृत वाघ मादी असून तिचे वय सात ते आठ महिने असल्याचा अंदाज वनविभागाने वर्तविला आहे. वाघिणीच्या शरीरावर ओरखडल्याचे निशाण आढळले आहेत. मृतक वाघिणीचे सर्व अवयव शाबूत आहेत. प्रौढ नर वाघाचे लढाईत या सात ते आठ महिन्यांच्या मादीला मारल्याचा अंदाज वनविभागाने वर्तविला आहे.
The discovery of the Dead body of a female tiger caused a stir
वनपरिक्षेत्र अधिकारी घटनास्थळी ताफ्यासह रवाना होऊन मृतदेह ताब्यात घेतला व वरिष्ठ अधिकाऱ्याना माहिती दिली. मृत वाघाच्या बछड्यास चंद्रपूर येथे हलविण्यात आले. शवविच्छेदन करून चंद्रपूर येथे त्याच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले.
पुढील तपास उपवनसंरक्षक मध्य चांदा वनविभाग श्वेता बोड्डू, सहाय्यक वनसंरक्षक शेंडगे यांचा मार्गदर्शनात वनपरीक्षेत्र अधिकारी एस. व्ही. मुरकुटे करीत आहे. शव विच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतर मृत्यूचे खरे कारण पुढे येणार आहे.
0 comments:
Post a Comment