Ads

स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूरने अवैध देशी दारू वाहतुक करणारे वाहन व त्यामधील बनावट देशी दारूच्या ४८५ पेटया केल्या जप्त Local Crime Branch Chandrapur has seized a vehicle carrying illegal country liquor and 485 cases of fake country liquor from it.

चंद्रपुर :-आज दि.११/११/२०२४ रोजी स्थानिक गुन्हे शाखा येथील पथके पोलीस स्टेशन कोरपना हददीत पेट्रोलिंग करीत असतांना गुप्तबातमीदार यांचेकडुन माहिती मिळाली की, एक आयशर कं. एमएच ४० एके-११४१ मधुन देशी दारूच्या पेट्या वाहतुक होणार असुन वाहन कं. एमएच-३२ एएक्स ११२६ महिद्रां एक्सयुव्ही ७०० कंपनीची गाडी ही पायलेटींग करणार आहे, अशा माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर येथील अधिकारी यांचे वेगवेगळे पथक तयार करून खाजगी वाहनाने नमुद वाहनाचा शोध करीत असतांना कोरपना अदिलाबाद हायवे वर आयशर वाहन दिसुन आले.
Local Crime Branch Chandrapur has seized a vehicle carrying illegal country liquor and 485 cases of fake country liquor from it.
नमुद वाहनाचा पाठलाग - करून सदरचे वाहन हे विधानसभा निवडणुक २०२४ परसोडा एसएसटी चेकपोस्ट येथे राज्य उत्पादन शुल्क विभाग चंद्रपूर, आरटीओ विभाग, पोलीस विभाग व महसुल विभाग येथील अधिकारी व स्टॉफचे मदतीने नाकाबंदी करून पकडुन ताब्यात घेतले.

 वाहनचालक आकाश देवीदास भोसकर, वय ३० वर्षे, व्यवसाय ट्रक चालक रा. सातघरे यांचे घरी किरायाने, शास्त्री वॉर्ड, हिंगणघाट ता. हिगंणघाट, जि. वर्धा व सहचालक अजय रामदास मुळे, वय ४८ वर्षे, धंदा ट्रक चालक, रा. गौतम वॉर्ड, हिंगणघाट ता. हिगंणघाट, जि. वर्धा यांचे ताब्यातील एक - आयशर कं. एमएच ४० एके-११४१ मध्ये पोत्याचे बंडल त्याखाली लपवुन ठेवलेल्या कागदी खोक्याच्या पेटया रॉकेट देशी दारू संत्रा एकुण ४८५ पेटयासह एकुण ३२,०७,५००/- रू मिळुन आल्याने पंचनामा कारवाई करून जप्त करण्यात आला आहे. नमुद जप्त देशी दारूची राज्य उत्पादन शुल्क विभाग चंद्रपूर यांचेकडुन पंचनामा कारवाई दरम्यान तपासणी केली असता सदरची देशी दारू ही बनावट असल्याबाबत अभिप्राय प्राप्त झाल्याने पोलीस स्टेशन कोरपना येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सदरची कारवाई स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर, राज्य उत्पादन शुल्क विभाग, चंद्रपूर, प्रादेशिक परिवहन विभाग चंद्रपूर व महसुल विभाग चंद्रपूर यांचे उपस्थितीत संयुक्तरित्या करण्यात आली आहे.

सदरची कारवाई मा.श्री. सुदर्शन मुम्मका पोलीस अधीक्षक चंद्रपूर, श्रीमती रिना जनबंधु अपर पोलीस अधीक्षक चंद्रपूर यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर, राज्य उत्पादन शुल्क विभाग, चंद्रपूर, प्रादेशिक परिवहन विभाग चंद्रपूर व महसुल विभाग चंद्रपूर यांनी संयुक्तरित्या केली आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment