जावेद शेख भद्रावती:-निर्भय सेवा फाऊंडेशनने सामाजिक बांधिलकी जपत पुन्हा एकदा आपला संवेदनशीलतेचा परिचय दिला आहे. संस्थेच्या वतीने एका गरीब कुटुंबाला मदतीचा हात पुढे करत, त्यांच्या दुःखात सहभागी होण्याचा प्रयत्न करण्यात आला.
Nirbhaya Seva Foundation's helping hand: Provided support to a poor family
भद्रावती तालुक्यातील चेक बरांज या गावातील कुटुंबातील एक सदस्याचा अलीकडेच मृत्यू झाला होता. कुटुंबाच्या आर्थिक परिस्थितीची जाणीव ठेवत, फाऊंडेशनने अंत्यसंस्कारासाठी आवश्यक सामान पुरवून कुटुंबाला मोठा आधार दिला.
फाऊंडेशनचे अध्यक्ष सुरज शहा आणि इतर सदस्यांनी स्वतः या कामात पुढाकार घेतला व कुटुंबाला मानसिक धीरही दिला. "समाजातील प्रत्येक गरजू व्यक्तीला मदतीचा हात देणे हीच आमची जबाबदारी आहे," असे अध्यक्षांनी यावेळी सांगितले.
निर्भय सेवा फाऊंडेशन नेहमीच गरजूंसाठी विविध प्रकारच्या सेवाकार्यांत अग्रेसर राहिली आहे. गरिबांसाठी वैद्यकीय मदत, शिक्षणासाठी सहाय्य, तसेच नैसर्गिक आपत्तींच्या वेळी मदतकार्य असे अनेक उपक्रम राबवून संस्थेने सामाजिक कार्यात आपला ठसा उमटवला आहे.
या उपक्रमामुळे समाजातील गरजू लोकांसाठी मदतीचा एक आदर्श निर्माण झाला आहे. संस्थेच्या या कार्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. कुटुंबातील परिवाराने निर्भय सेवा फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष सुरज शहा, दीपक तुरारे, सॅम्युअल गंधम, सुमित हस्तक, बालू जोगी, प्रवीण तुराणकर, कालिदास सेलोटे, हसन शेख, किशोर दिवसे, रोहन गज्जेवार, सुशांत रायपुरे, विशाल डोळस, गोपाल शहा, नयना गंधम, मुनमुन शहा, नेहा हस्तक, निकिता जनबंधू, माही तुरारे, तब्बसूम शेख, प्रिया जोगी, नीलिमा तुराणकर, करिष्मा झाडे, रवी झाडे, विवेक गोहणे व इतर सर्व सदस्यांचे आभार व्यक्त केले.
0 comments:
Post a Comment