Ads

चंदनखेडा येथे रक्तदान शिबिराचे आयोजन Organization of blood donation camp at Chandankheda

भद्रावती - तालुक्यातील चंदनखेडा परिसरातील प्रसिद्ध युवा कार्यकर्ते परिवर्तनाची जाणीव असलेले , माजी उपसरपंच तथा समाजपरिवर्तक विठ्ठलजी रामकृष्ण हनवते यांच्या ४४ व्या वाढदिवसानिमित्त दि.६ नोव्हेंबरला सकाळी ७.३० ते ३ वाजे पर्यंत चंदनखेडा येथे विविध सामाजिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे.
Organization of blood donation camp at Chandankheda
या क्रार्यक्रमाचे आयोजन विठ्ठलजी रामकृष्ण हनवते मित्र परिवार,बिरसा मुंडा आदिवासी पुरुष बचत गट, शौर्य क्रिडा मंडळ,विरांगना मुक्ताई क्रिडा मंडळ चरुर (धा), व बिरसा बचत गट कोकेवाडा (मा). यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आलेले आहे. 
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बिरसा मुंडा आदिवासी पुरुष बचत गट, शौर्य क्रिडा मंडळ व विठ्ठलजी रामकृष्ण हनवते मित्र परिवारातील अमित नन्नावरे, मंगेश नन्नावरे, स्वप्निल कुळसंगे, मंगेश हनवते, राहुल चौधरी, शुभम भोस्कर, राहुल कोसुरकार, महेश केदार, रोशन मानकर, नंदकिशोर जांभुळे, गणेश हनवते, पुरुषोत्तम चौखे, कुणाल ढोक,भुपेश निमजे, राहुल दडमल, पंकज दडमल, शंकर दडमल, राकेश सोनुले, संदिप चौधरी, प्रफुल्ल ठावरी, प्रज्वल बोढे, दिलिप ठावरी, प्रविण भरडे, दिनेश दोडके, अविनाश नन्नावरे, अविनाश पुसदेकर, संतोष गायकवाड, स्वप्निल चौखे, अनिल हनवते, देवानंद दोडके, आशिष बारतीने,, देविदास चौखे, प्रणित हनवते, पंकज मानकर,मयुर जांभुळे, अमोल दडमल, वृषभ दडमल, अमोल महागकार, आणि आशिष हनवते संयुक्तपणे परिश्रम घेत आहे.वाढदिवसानिमित्त ,दि .६ नोव्हेंबर रोजी बुधवार ला सकाळी ७.३० वाजता राजमाता माणिका, पेणठाणा पुजन ,८.३०  वाजता पेणठाणा परिसरात श्रमदानातून स्वच्छता, वृक्षारोपण,व ११ वाजेपासून रक्तदान शिबिरास सुरूवात करण्यात येईल.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment