The struggle for development of Warora-Bhadravati Assembly will not slow down anywhere - Pravin Kakade
वरोरा-भद्रावती विधानसभा क्षेत्रातील ग्रामीण भागातील माजरी, पाटाळा, कुचना सोबत अनेक गावांत प्रविण काकडे यांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. या प्रचारादरम्यान मागील 5 वर्षांतील विकास कामे मतदारांपर्यंत पोहचवून मतदारांचा विश्वास संपादन करीत आहे. प्रत्येक गावातील झालेल्या कामांची यादी नागरीकांना देऊन आपल्याल निवडणून देण्याचे आवाहन ते मतदरांना करीत आहे.
वरोरा-भद्रावती विधानसभेच्या विकासाचा झंजावात कुठेही कमी होणार नाही-प्रविण काकडे
वरोरा-भद्रावती विधानसभेत विकासाची अनेक कामे दिवंगत खासदार बाळूभाऊ धनोरकर व खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या माध्यमातून झालेली आहे. मागणी 5 वर्षांच्या काळात 1500 कोटी रुपयांची विकासकामे विधानसभा क्षेत्रात झाली. हा विकासाचा झंजावात खासदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या नेतृत्त्वात पुढेही चालू राहील असा विश्वास वरोरा-भद्रावती विधानसभा क्षेत्रातील महाविकास आघाडी चे उमेदवार प्रविण काकडे यांनी प्रचारादरम्यान नागरीकांशी संवाद साधत आपल्या भावना व्यक्त केल्या.
0 comments:
Post a Comment