Ads

ना.सुधीर मुनगंटीवार यांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्क

चंद्रपूर, दि.२० - राज्याचे वने, सांस्कृतीक कार्य आणि चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा बल्लारपूर विधानसभा मतदारसंघाचे भाजप-महायुतीचे अधिकृत उमेदवार ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी बुधवारी (दि. २० नोव्हेंबर) दुपारी सहकुटुंब चंद्रपुरातील सिटी हायस्कूलमध्ये मतदानाचा हक्क बजावला. यावेळी पत्नी सौ. सपनाताई मुनगंटीवार, जावई डॉ. तन्मय बिडवई, मुलगी डॉ. शलाका मुनगंटीवार - बिडवई त्यांच्यासोबत उपस्थित होते.
Sudhir Mungantiwar and his family exercised their right to vote.
राज्यात आज (बुधवार) एकाच टप्प्यात विधानसभा निवडणूकीसाठी मतदान झाले. यावेळी राज्याचे वने व सांस्कृतीक कार्य मंत्री तथा बल्लारपूर विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार ना. श्री. सुधीर मुनगंटीवार देखील लोकशाहीच्या या उत्सवात सहकुटुंब सहभागी झाले. महायुती सरकारने गोरगरिबांची सेवा केली. महिलांचे आर्थिक सक्षमीकरण, युवकांच्या हाताला रोजगारावर भर दिला. त्यामुळे निवडणुकीत भाजप-महायुती रेकॉर्डब्रेक मताधिक्‍याने विजयी होईल, असा विश्वास त्यांनी मतदानानंतर चंद्रपुरातील सिटी हायस्कूलमध्ये व्यक्‍त केला.

मतदान हा लोकशाहीचा सर्वांत मोठा उत्सव आहे. मतदान करणे आपला अधिकार असून, त्याचा वापर लोकशाही बळकट करण्यासाठी करा. मी सहकुटुंब मतदान केल आहे, जनतेला माझं आवाहन आहे की, आपण सर्वांनी मतदान कराव. सगळ्यांनी मतदानासाठी घराबाहेर पडलं पाहीजे, असे आवाहन ना. मुनगंटीवार यांनी केले आहे.


भाजप-महायुतीचा विजय निश्चित
देशगौरव,पंतप्रधान नरेंद्रजी मोदींनी देशाला ‘विकसित भारत’ करण्याचा संकल्प केला आहे. त्यासाठी जनतेने मतदानाच्या रुपाने आहुती द्यायला हवी. जास्तीत जास्त प्रमाणात मतदान झालं पाहिजे. विधानसभा निवडणुकीच्या परीक्षेत आम्ही नक्कीच उत्तीर्ण होऊ, असा विश्वासही ना. श्री. मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment