जावेद शेख प्रतीनिधी भद्रावती:-
भद्रावती-वरोरा विधानसभा क्षेत्रात पार पडलेल्या निवडणुकीत महायुतीचे उमेदवार करण देवतळे विजयी झाले. आमदार झाल्यानंतर त्यांचे प्रथम भद्रावती शहरात आगमन झाल्यानंतर शहरातील बाळासाहेब ठाकरे प्रवेशद्वारापासून सायंकाळी सहा वाजता शहरातील मुख्य रस्त्याने भव्य रॅली काढण्यात आली. प्रथम नवनियुक्त आमदार करण देवतळे यांचे शहरातील बाळासाहेब ठाकरे प्रवेशद्वारात आगमन झाल्यानंतर भाजप तर्फे त्यांचे फटाक्यांच्या आतिषबाजीत मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले.
Victory rally of newly appointed Mahayuti MLA Karan Devtale in Bhadravati.
त्यानंतर ढोल ताशांच्या, डीजेंच्या व विजयी घोषणाच्या निनादात रॅलीला सुरुवात करण्यात आली. रॅली दरम्यान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज व महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करण्यात आले. मुस्लिम समाज तरफे जामा मस्जिद अध्यक्ष हाजी बबन सेठ हाजी जावेद सेठ, शाहिद कुरैशी, नाजिम शेख, सेहरीश, हाजी अब्बास यांचे कङून शाल श्रीफल स्वागत करनायत आले त्यानंतर सदर रॅली भद्रनाग मंदिराच्या प्रांगणात पोहोचल्यानंतर रॅलीची सांगता करण्यात आली. त्यानंतर रॅलीचे जाहीर आभार सभेत रुपांतर झाले. यावेली मंचावार ओबीसीमागास वर्गीय आयोग चे अध्यक्ष हंसराज अहीर,चंदू गुंडावर,, राष्ट्रवादी कांग्रेस चे नेता विलास नेरकर, रमेश राजुरकर,अशोक हजारे,, सिकंदर शेख, अमित गुंडावर,इमरान खान,,सुनील नामोजवर,, युवराज धनोरकर, आदि ची उपस्थितहोते,सदर रॅलीत महायुतीचे पदाधिकारी,कार्यकर्ते तथा नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
0 comments:
Post a Comment