चंद्रपुर :-दिनांक 23 /12/ 2024 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक चंद्रपूर जिल्हा परिसरात पेट्रोलिंग करीत असताना ट्रक क्रमांक CG 24 S-2672 मध्ये गोवंश जनावरे कत्तलीसाठी पडोली मार्गे घुगुस कडे जात असल्याची गोपनीय माहिती मिळाल्याने स्था.गु.शा. पथक घुगुस रोड,धानोरा फाटा येथे नाकाबंदी करून सदर ट्रक थांबवून तपासले असता ट्रक मध्ये 45 नग गाई व बैल गोवंश जनावरे दाटीवाटीने वाहनात भरून गोवंश जनावराचे पाय बांधून कत्तली करिता वाहतूक करीत असतांना मिळून आले.
Police seize truck carrying 45 cattle for slaughter
सदर ४५ नग गोवंश जनावरांना प्यार फाउंडेशन गोशाळा दाताळा , चंद्रपूर येथे दाखल करण्यात आले.
४५ नग गोवंश जनावरे व जुना वापरता ट्रक क्रमांक CG 24 S-2672 असा एकुण १९,१८,०००/रू.चा माल जप्त करुन दोन आरोपींना पो.स्टे. घुगुस यांचे ताब्यात दिले.
पोलीस स्टेशन घुग्घुस येथे अप क्रं ४४२/२०२४ कलम ११(१) (घ),(ड),(च), (ज ) महाराष्ट्र प्राणिरक्षण अधिनियम सह कलम ५(अ),९,११ प्रण्यांना क्रुरतेने वागवण्यास प्रतिबंध
अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
सदरची यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखेचे महेश कोंडावार यांच्या मार्गदर्शनाखाली परिविक्षाधीन उपविभागीय पोलीस अधिकारी चौघुले सा.यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे शोध पथकाचेAPI कांक्रेडवार,PSI सामलवार, पोहवा महात्मे, जयंता,चेतन पो.अं. वकाटे, सावे चापोहवा दिनेश यांनी केली.
0 comments:
Post a Comment