Ads

भद्रावती तहसील कार्यालयात राष्ट्रीय ग्राहक दिन कार्यक्रम संपन्न

जावेद शेख भद्रावती, दि.२४ : येथील तहसील कार्यालय येथे राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रम राजेश भांडारकर, तहसीलदार भद्रावती यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यातआला. यावेळी प्रविण रामचंद्र चिमुरकर, सदस्य जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद, चंद्रपुर, तसेच अखिल भारतीय ग्राहक पंचायत चे वामन नामपल्लीवार, पुरूषोत्तम मत्ते, बालाजी दांडेकर आणि वसंत वर्हाटे उपस्थित होते.
National Consumer Day program concluded at Bhadravati Tehsil Office
जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेचे सदस्य, प्रविण चिमुरकर यांनी ग्राहक संरक्षण कायदा, ग्राहकांचे हक्क, अधिकार, ग्राहक आयोग आणि यावर्षी जनजागृती ची शासनाची थीम "वर्च्युअल हियरिंग अँड डिजीटल ऍक्सेस टु कंझ्युमर जस्टीस""Virtual Hearing and Digital Access to Consumer Justice"याविषयी विस्तृत माहिती दिली.
वामन नामपल्लीवार यांनी विविध विभाग आणि ग्राहक यांच्याबद्दलची माहीती दिली. पुरूषोत्तम मत्ते यांनी ग्राहक पंचायत भद्रावती चा इतिहास मांडला. तर वसंत वर्हाटे यांनी अखिल भारतीय ग्राहक पंचायत ची स्थापना व चळवळ विषयी माहिती दिली.
तहसीलदार भांडारकर यांनी ग्राहक हा केंद्र बिंदू असून ग्राहकाने वस्तू विकत घेतांना पक्के बिल, गॅरंटी, वॉरंटी कार्ड घेतलेच पाहिजे. ज्यामुळे भविष्यात ग्राहक न्याय मिळविण्यासाठी फायदेशीर असेल असे वक्तव्य केले.
कार्यक्रमाचे संचालन निरीक्षण अधिकारी हर्षा दुधे यांनी केले तर आभार प्रदर्शन नायब तहसिलदार आकनुरवार यांनी केले. कार्यक्रमास अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे पदाधिकारी, सदस्य, रेशन दुकानदार, कर्मचारी आणि नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment