Ads

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या आक्षेपार्ह विधानाविरोधात चंद्रपूर काँग्रेसचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

चंद्रपूर : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी संसदेत गृहमंत्री अमित शाह यांनी केलेल्या कथित आक्षेपार्ह विधानाचा निषेध करण्यासाठी चंद्रपूर शहर काँग्रेस, जिल्हा काँग्रेस आणि मित्र पक्षांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. मंगळवारी (२४ डिसेंबर) सकाळी ११ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरातून मोर्चास प्रारंभ झाला.
Chandrapur Congress marches to Collector's office against Union Home Minister Amit Shah's objectionable statement
या मोर्चामध्ये काँग्रेसच्या विविध फ्रंटल संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या उपस्थितीत मोर्चा पार पडला. सहभागी झालेल्या नेत्यांनी गृहमंत्री अमित शाह यांना जाहीर माफी मागण्याची तसेच त्यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा देण्याची मागणी केली.

मोर्चामध्ये प्रमुख नेत्यांमध्ये माजी आमदार तथा काँग्रेस जिल्हाध्यक्ष सुभाष धोटे आणि चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रितेश (रामू) तिवारी यांनी सहभाग घेतला.
मोर्चादरम्यान डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले.

काँग्रेस कार्यकर्त्यांनी शाह यांच्या विधानाचा तीव्र निषेध करत देशातील लोकशाही व घटनात्मक मुल्यांचे रक्षण करण्यासाठी लढा देण्याचा निर्धार व्यक्त केला.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment