घुग्घुस : शहरात नागरी सत्कार समिती व समस्त शहरवासीयांतर्फे शनिवार 28 डिसेंबरला सायंकाळी 5 वाजता प्रमोद महाजन रंगमंच, आठवडी बाजार घुग्घुस येथे भव्य नागरी सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे.
Grand civic felicitation ceremony in Ghugus city
सत्कारमुर्ती म्हणून बल्लारपूर विधानसभा क्षेत्राचे आमदार तथा माजी मंत्री वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय सुधीरभाऊ मुनगंटीवार, चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे आमदार किशोरभाऊ जोरगेवार, राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार देवरावदादा भोंगळे उपस्थित राहणार आहे.
आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार, आमदार किशोरभाऊ जोरगेवार आणि घुग्घुस ही ज्यांची जन्मभूमी व कर्मभूमी राहिली आहे असे घुग्घुस शहराचे भूमिपुत्र, घुग्घुस शहराचा चेहरा मोहरा बदलणारे, विकासपुरुष आमदार देवरावदादा भोंगळे यांचा विधानसभा निवडणुकीत प्रचंड मताधिक्याने विजय झाल्याबद्दल तसेच देवरावदादांची जन्मभूमी घुग्घुस शहरात प्रथम आगमनानिमित्त भव्य नागरी सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे.
या भव्य दिव्य अशा ऐतिहासिक कार्यक्रमास समस्त घुग्घुसकर नागरीकांनी, सर्व सन्माननीय पदाधिकारी तसेच कार्यकर्ते, हितचिंतक आणि मित्रपरिवाराने मोठया संख्येत उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
0 comments:
Post a Comment