सिंदेवाही -- सिंदेवाही तहसिल कार्यालय मध्ये आज बुधवार दिनांक 25/12/2024 रोजी तहसिलदार संदीप पानमंद,व नायब तहसीलदार तुमराम, देशमुख यांच्या हस्ते भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारीं वाजपेयी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारीं वाजपेयी यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन करण्यात आले.
Atal Bihari Vajpayee's birth anniversary celebrated at Sindewahi Tehsil Office
तसेच अटल बिहारीं वाजपेयी यांच्या जयंती निमित्त केंद्र शासनाच्या निर्देशानुसार तहसील कार्यालयात सुशासन सप्ताहचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये विविध प्रकारचे दाखले नागरिकांना देण्यात आले.यावेळी हरीश कोवे, पुरवठा निरीक्षक अधिकारी लोखंडे, कुथेकर बाबू ,कोतवाल तुलसी गेडाम व इतर महसूल कर्मचारी तसेच प्रफुल रहाटे ,अभि संगीडवार हे उपस्थित होते.
0 comments:
Post a Comment