सादिक थैम वरोरा: वरोरा वणी महामार्गावरील शेंबळजवळ आज 10 डिसेंबर रोज मंगळवारला झालेल्या अपघातात दुचाकीस्वार घटनास्थळीच मृत्यू पावला.
वरोरा येथील कर्मवीर वार्ड रहवासी प्रवीण रामकृष्ण वाभीटकर वय 45 हे वरोरा वरूण आज सकाळी दहाच्या सुमारास आपल्या दुचाकी क्रमांक एम एच ३४ एजी २८३९ ने शेंबळ ला मामाच्या तेरवी साठी जात होते. शेंबळ या गावाजवळ असलेल्या वळणावर गावात जाण्यासाठी ते वळले असता मागून येणाऱ्या एमजी हेक्टर कंपनीच्या कार क्रमांक एम एच २९ बीपी ७७२२ ने त्यांना जोरदार धडक दिली. ही धडक एवढी जोरदार होती की प्रवीण वाभीटकर यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
ही कार वणी येथील मुकेश साहू यांच्या मालकीची असल्याचे वृत्त आहे. घटनेची वृत्त कळताच घटनास्थळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने गोळा झाले व त्यांनी मृतकाच्या नातलगास आर्थिक मोबदला मिळे पर्यंत शव उचलणार नाही अशी भूमिका घेतली. घटनेचे वृत्त कळताच पोलीस उपनिरीक्षक अनिल मेश्राम हे घटनास्थळी पोहोचले व त्यांनी जमावाला शांत केले . शव विच्छेदनासाठी मृतकाचे शव वरोरा येथील उपजिल्हा रुग्णालयात रवाना केले. मृतकाच्या पश्चात पत्नी व तीन मुली आहेत.
मुकेश साहू यांनी मोबदला म्हणून मृतकाच्या पत्नीस 15 लाख रुपये दिले. मोबदला मिळाल्यानंतर आज सायंकाळी मृतकाचे शवविच्छेदन करण्यात आल्यानंतर शव नातेवाईकाच्या स्वाधीन केल्या गेले.यावेळी रुग्णालय परिसरात मोठा जमाव जमला होता. या जमावत घटनेबद्दल उलट सुलट चर्चा ऐकावयास मिळाली. घटनेचा तपास पोलीस निरीक्षक अजिंक्य तांबडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अनिल मेश्राम करीत आहे.
0 comments:
Post a Comment