सादिक थैम वरोरा: शेतकऱ्यांच्या विविध मागण्या घेऊन शेतकरी नेते किशोर डुकरे यांच्या नेतृत्वात भीक मांगो आंदोलन पुकारण्यात आले होते. या आंदोलनाची सुरवात वणी विधानसभा क्षेत्राचे आमदार संजय देरकर यांच्या उपस्थितीत करण्यात आली. यावेळी त्यांच्या पत्नी सुद्धा उपस्थित होत्या. भीक मांगो आंदोलनाची जमा झालेली रक्कम तालुका कृषी अधिकारी यांच्या मार्फत राज्य शासनाला पाठविण्यात आली.
Farmers' begging protest in Warora city
वरोरा शहरातील रत्नमाला चौक येथून भीक मांगो आंदोलनाची सुरुवात करण्यात आली. दरम्यान त्याच वेळी वणी विधानसभा क्षेत्राचे उबाठा गटाचे नवनियुक्त आमदार संजय देरकर अचानक पणे हजर राहून आंदोलन स्थळी उपस्थित झाले. त्यांच्या हस्ते डॉ. ऐ पी जे अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून भीक मांगो आंदोलनास सुरुवात करण्यात आली. आमदार देरकर यांनी स्वःता 1 हजार रुपयाची भीक देऊन शेतकरी आंदोलनास सहकार्य केले तसेच त्यांच्या सोबत असलेल्या त्यांच्या पत्नी यांनी नारे बाजी करत आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. सदर भीक मांगो आंदोलनाची सुरवात रत्नमाला चौक पासून करण्यात आली. व तालुका कृषी अधिकारी कार्यालयात भीक मांगो आंदोलनातून जमा झालेली 4 हजार रुपयाची रक्कम तालुका कृषी अधिकारी यांच्या कडे सोपवून त्यांच्या मार्फत राज्य शासनाला पाठविण्यात आली. तसेच सदर मागण्या पुढील एक महिन्यात मान्य कराव्या अन्यथा शेतकरी आत्मदहन करणार असा इशारा ही यावेळी दिला. तर संबंधित विषय नागपुर येथील हिवाळी अधिवेशनात गाजविणार असल्याचे आमदार संजय देरकर यांनी यावेळी सांगितले.
या आंदोलनास शेतकरी नेते किशोर डुकरे, छोटू शेख, दत्ता बोरेकर, श्याम लेडे, वसंत विधाते, पुष्पाकर खेवले, तुकाराम निब्रड, संदीप वासेकर, मनोहर आस्वले, केशव ताजने, मंगेश एकरे, वृषभ आस्वले, प्रसाद मिलमीले, मनोज तेलंग सह तालुक्यातील शेकडो शेतकरी बांधव सहभागी झाले होते.
0 comments:
Post a Comment