कोरपना तालुका प्रतिनिधि:- चंद्रपूर जिल्ह्यातील बामणी परसोडा तेलंगाना महाराष्ट्राची जोडणारा ३५३ बि हा मार्ग जानेवारी 2022 पासून वेगवान गतीने सुरू आहे मात्र जीआरआयएल कंपनीने राजुरा पासून तेलंगाना सीमेच्या कोरपणा तालुक्याच्या टोकेपर्यंतअस्तित्वात असलेले देवघाट धामणगाव चंदनवाही मुठरा कन्हाळगाव रूपापेठ इत्यादी भागातील शेकडो किलोमीटर नाल्यांमधून रेती दगड मातीचा उपसा केला
GRIL company's excavation work? Drains deepened; agricultural irrigation situation
शासनाच्या उद्देशाला तिलांजली देत या कंपनीने नाल्यामध्ये अस्तित्वात असलेले दगड उघडे पडेपर्यंत संपूर्ण गौन खनिजदगड मुरूम माती शासनाच्या व जिल्हाधिकारींच्या आदेशाला केराची टोपली दाखवीत उत्खनन केले नियमबाह्य रात्रच्या अंधारात उत्खननाची परवानगी नसताना सुद्धा कोरपणा तालुक्यातील अविरत 24 तास नाले उत्खनन करून संपूर्ण दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण केली आहे नाल्यावर अनेक शेतकरी विद्युत पंप द्वारे सिंचनाची शेती करीत होते मात्र नदी काठापासून जंगलाच्या काठापर्यंतसंपूर्ण नाले खोल करण्यात आले मात्र जलसंचयन साठा होईल व याच्यामुळे शेतकऱ्यांना लाभ होईल हा उद्देश कागदोपत्री दाखवून उत्खननाची परवानगी देण्यात आली मात्र नियमाला डावलून कुठेही पर्यायी सिंचन व भूगर्भात पाणी पातळी वाढेल असा कोणताही उपक्रम या कंपनी मार्फतीने राबविला गेला नाहीपरिणामचा शेकडो एकर शेतकऱ्यांचा सिंचनाला फटका बसला यामुळे नाल्यामध्ये असलेले जलाशयाचे स्त्रोत संपूर्ण नष्ट झाले असून नाल्यामध्ये अस्तित्वात असलेले संपूर्ण डोह भुई सपाट झाल्याने पाण्याची पातळी नाल्यामध्ये दिसून येत नाही व पाण्याचे स्त्रोत येवा नष्टनष्ट झाल्याने शेतकरी डिसेंबर महिन्यातच दुष्काळाच्या झळा सहन करण्याची पाळी बळीराजावर आली आहे या कंपनीने या भागातील अनेक अस्तित्वात असलेले नाल्यावरील बंधारे फोड फार करून रस्ते निर्माण केले परंतु बोरगाव येथील तीन बंधारे फोडून रस्ता तयार केला परंतु या कंपनीने दुरुस्तीचा कोणताही पर्याय केलेला नाही कुसळ या ठिकाणी अपघात घडून जीवनाने मुकण्याची पाळी गावकऱ्यावर आली याबाबत बऱ्याचदा पत्र व्यवहार करून सुद्धा कंपनी व्यवस्थापनाने गावालगत नाल्यावर बनवलेला तात्पुरता पाईप रपटापहिल्याच पाण्याच्या पुरामुळे नासघुस त्यावरून बैलबंडी किंवा ट्रॅक्टर जाता येत नाही अनावधानाने विचित्र घटना घडल्यास जीवनाने मुकण्याची पाळी त्या रस्त्यावरून जाणाऱ्यांची झाली आहे कुसळ येथील बंधारा दुरुस्त करून देण्यात येईल असे एक नव्हे चार वेळा सांगण्यात आले मात्र आजपर्यंत ही ते काम जीआरएल कंपनीने केलेला नाहीजिल्हाधिकारी यांनीउत्खनन करण्याचे अटी निकष व निकषटाकून दिले मात्र कोरपणा तालुक्यामध्ये तीनदा एफ आय आर दाखल झाला मात्र कोरपणा येथील तहसीलदारांनी ताब्यात घेतलेले वाहन कोणत्याही वरिष्ठ कार्यालयाची परवानगी नसताना रात्री अकरा वाजता पोलिसांनी ताब्यात घेतलेले वाहन सोडून दिले यामुळे कुंपणच शेत खात असल्याचे चित्र निर्माण झाले या कंपनीने अविरत कुठे अवधी रुपयाचा गौण खनिज अतिरिक्त उत्खनन करून शासनाच्या तिजोरीला चुना लावण्याचे काम केले आहे मात्र अधिकारी यांची छुपी यामुळे नेमके पाणी कुठे मुरत आहे हा प्रश्न लोकांमध्ये चर्चेला गेला आहे या कंपनीने मोठ्या प्रमाणात अतिरिक्त उत्खनन मोघम पंचनामे व नाल्यातील मोजमाप उपयोगिता प्रमाणपत्र चुकीच्या पद्धतीने घेऊन शासनाची दिशाभूल केली आहे पकडी गड्डम जलाशयाची नियमबाह्य कालव्याचे उत्खनन केल्याची तक्रार पोलिसांमध्ये शाखा अभियंतांनी दिली असताना सुद्धा आजपर्यंत चौकशी होऊन कारवाई केल्या गेली नाही कुसळ या ठिकाणी रात्री एक वाजता स्वतः तहसीलदार यांनी मोक्यावर पोलिसा समक्ष उत्खनन होत असताना पाहणी केली मात्र कोणतीच कारवाई न करण्यामुळे मागे नेमकी माशी कुठे शिंकलीयावरून या भागातील राष्ट्रीय महामार्गाच्या नावाने संपूर्ण नाले उध्वस्त करण्यात आले असून शासनाचे धोरण जिल्हाधिकाऱ्यांच्या अटी शर्ती भंग करून करण्यात आलेल्या उत्खननाची संपूर्ण चौकशी होऊन कारवाई होणार का की या प्रकरणाला पडदा पाडल्या जाईल अशी शंका नागरिकांमध्ये चर्चेला जात आहे
0 comments:
Post a Comment