राजुरा :- राजुरा येथील प्रतिष्ठित नागरिक नवरतन गोठी यांची धर्मपत्नी रंभादेवी गोठी यांच दिनांक 2 डिसेंबर 2024 ला दुःखद निधन झालं त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ 'एक पेड माँ के नाम' 'One Tree In the Name of Mother' उपक्रमा अंतर्गत पशुवैद्यकीय चिकित्सालय राजुरा येथे गोठी मेडिकल राजुराचे संचालक प्रशांत गोठी यांच्या शुभहस्ते पिंपळ व वड वृक्षाचे वृक्षारोपण करण्यात आले .
या प्रसंगी डॉ सुचिता धांडे , सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन राजुरा , डॉ . नरसिंग तेलंगे , पशुधन विकास अधिकारी राजुरा , तालुका लघु पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय राजुरा , श्रेया परळपगार ,पशुधन पर्यवेक्षक , अलंकार तामगाडगे परिचर , दिव्या प्रशांत गोठी , दिनबंधू परिवार राजुराचे जेष्ट सदस्य रत्नाकर वनकर व वृक्षप्रेमी भास्कर करमनकर, राजुरा तालुका संघटक नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था आदिंची प्रामुख्याने उपस्थिती होती .यावेळी डॉ. सुचिता धांडे सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन राजुरा यांनी या उपक्रमाचे कौतुक केले तसेच नियमितपने वृक्षारोपण करीत असल्यामुळे त्यांनी नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेचे राजुरा तालुका संघटक वृक्षप्रेमी भास्कर करमनकर यांचं अभिनंदन केले .
0 comments:
Post a Comment