Ads

कँसर आजार देणाऱ्या कागदी कपावर बंदी आणाBan paper cups that cause cancer

भद्रावती, जावेद शेख (तालुका प्रतिनिधी):-अखिल भारतीय ग्राहक पंचायत, भद्रावतीने दि. ०६ जानेवारीला कँसर आजार देणाऱ्या कागदी कपावर बंदी आणण्यासाठी राजेश भांडारकर, तहसीलदार भद्रावती यांचे मार्फत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
Ban paper cups that cause cancer
     चहा हे मुख्य पेय झाले आहेत व सर्वत्र लहान, मोठे चहाचे दुकाने शहरात, खेड्यात चौका चौकात मोठया प्रमाणात आहेत. ग्राहक नागरीक मोठया प्रमाणात चवीने चहा पितात गरम चहा हा कागदी कपात दिल्या जातो व त्या कागदी कपाचे आतील आवरणात प्लास्टिक आणि रसायनाचा वापर करुन डिस्पोजेबल कप तयार केले जातात. गरम पेय टाकल्यामुळे आतील प्लास्टिकचे विघटन होउन त्याचे कन चहा व इतर गरम पेयात येतात व ते पेय पिनाऱ्यांच्या शरीरात जातात. यामुळे कागदी कपात चहा किंवा गरम पेय पिल्यास कर्करोग होऊ शकतो. 
     दिर्घकाळ या कपाचा वापर करत राहिले तर कर्करोग होऊ शकतो अशा बातम्या वृत्तपत्रात वाचण्यात आल्या. तसेच बातम्यात डॉक्टर यांनी सांगितले की बीस्फेनॉल आणि BPA सारखी रसायने आढळतात ही अत्यंत घातक रसायने आहेत. या कपामध्ये चहा किंवा गरम पाणी प्यायल्यास त्यातील रसायने त्यामध्ये विरघळतात आणि ही रसाने पोटात पोहोचतात त्यामुळे कर्करोगाचा धोका होऊ शकतो. अशा बातम्या समाज माध्यमावर आहेत .
    नुकताच जिल्हाधिकारी बुलढाणा यांनी सुध्दा चहा च्या कागदी कपावर बंदी घालण्याचा आदेश काढला व तो आदेश सोशल मीडियावर वाचण्यात आला.
     त्यामुळे चंद्रपुर जिल्हयात सुध्दा याविषयीचे गांभीर्य ओळखुन कागदी कपावर बंदी आणून चहा चीनी माती, काचेचा ग्लास, कुल्ल्हड इत्यादी मधे देण्याबाबत निर्णय घेऊन कॅन्सर सारख्या बिमारी पासून नागरिकांचा बचाव करावा अशी निवेदनातून मागणी करण्यात आली.
     
     निवेदन देऊन चर्चा करताना प्रवीण चिमुरकर, जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद, चंद्रपुर तथा सचिव, अखिल भारतीय ग्राहक पंचायत भद्रावती, तसेच अखिल भारतीय ग्राहक पंचायत चे पदाधिकारी बालाजी दांडेकर, वसंत वर्हाटे, वामन नामपल्लीवार, पुरूषोत्तम मत्ते, मोहन मारगोनवार, गुलाब लोणारे, केशव मेश्राम, करूणा मोघे, जयपूरकर, सातपूते इ. ची उपस्थिती होती.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment