चंद्रपूर :-चंद्रपूर शहरात मानवी मेंदूवर विपरित परिणाम करणाऱ्या आमली पदार्थांच्या सेवनाची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक रिना जनबंधू, एसडीपीओ सुधाकर यादव यांनी चंद्रपूर शहर व रामनगर पोलिसांना अशा पदार्थांच्या विक्रेत्यांवर कारवाई करण्याची सूचना केली. स्थानकाचे प्रभारी अधिकारी यांना माहिती व मार्गदर्शन करण्यात आले आहे. त्यानुसार हा पदार्थ विकणाऱ्या व्यक्तीची गुप्त माहिती काढली जात आहे. 5 जानेवारी 2024 रोजी सकाळी 9 च्या दरम्यान रामनगर पोलीस स्टेशन अंतर्गत फॉरेस्ट अकादमी समोरील इंदिरानगर मेन रोडवर नितीन सोमलाल भलावी रा.मोहगाव तहसील कुरई जिल्हा शिवनी मध्यप्रदेश यांच्याकडून पानठेलेत गांजा विक्री होत असल्याची गुप्त माहिती रामनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आसिफ राजा शेख यांना मिळाली होती. माहितीच्या आधारे तपास पथक आणि अधिकाऱ्यांना छापेटाकण्याचे आदेश देण्यात आले.
Police arrest man selling marijuana under the guise of a Pan shop
पोलिस निरीक्षक शेख यांनी ही माहिती दिली. तपास पथकाचे प्रमुख सपोनि हिमांशू उगले यांनी आपल्या टीम सोबत छापा टाकला असता नितीन भलावी हा 1.087 किलो गांजा एका छोट्या बंडलमध्ये विक्रीच्या उद्देशाने ठेवत असल्याचे आढळून आले. पोलिसांनी नितीनच्या ताब्यातून गांजा जप्त केला असून रामनगर पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक 21/2025 कलम 8 अ, 20 ब, 2, ब, 29 एनडीपीएस नुसार गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली.
ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक रिना जनबंधू, एसडीपीओ सुधाकर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली रामनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आसिफ राजा शेख, सपोनि देवाजी नरोटे, हिमांशूगळे, पोलीस अधिकारी आनंद खरात, पोलीस अधीक्षक डॉ. सचिन गुरुनुले, लालू यादव, पेत्रज सिडाम, प्रशांत शेंद्रे, शरद कुडे, मनीषा मोरे, अमोल गिरडकर, रविकुमार. ढेंगळे, संदीप कामडी, हिरा गुप्ता, पंकज ठोंबरे, प्रफुल्ल पुप्पलवार, ब्लूटी साखरे व टीम.
0 comments:
Post a Comment