Ads

ग्रामीण पत्रकार संघाच्या कोरपना तालुका अध्यक्षपदी सै.मुमताज यांची तिसऱ्यांदा फेरनिवड

कोरपना :-पत्रकार दिनाच्या पूर्वसंध्येला गडचांदुर येथे महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष राजेश सोलापन (दि चंद्रपूर टाइम्स, राष्ट्रपत्रिका) उपाध्यक्ष अनिल देठे (विदर्भ समाचार ),सचिव विनोद पन्नासे (चंद्रपूर वार्ता) व मार्गदर्शक धर्मेश निकोसे (आवाज इंडिया ) यांच्या प्रमुख उपस्थितीत कोरपना तालुका महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघाची वार्षिक आढावा बैठक पार पडली.यामध्ये सर्वानुमते तिसऱ्यांदा 'सैय्यद मुम्ताज़ अली'(संपादक कोरपना लाईव्ह) यांची तालुकाध्यक्ष पदी निवड करण्यात आली.
Sy. Mumtaz ali re-elected as Korpana Taluka President of Rural Journalists Association for the third time
यानंतर लगेच तालुकाध्यक्ष अली यांनी नवीन तालुका कार्यकारिणी घोषित केली.यामध्ये गणेश लोंढे कार्याध्यक्ष,(दै. देशोन्नती) उपाध्यक्ष अनिल गेडाम दै. महासागर,सचिव सतिश बिडकर (आधार न्यूज) सहसचिव अमोल बेरड दै महासागर,संघटक गौतम धोटे पुण्यनगरी,सकाळ तर मयुर एकरे यांची प्रसिद्धी प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली.सर्वांचे पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. दरम्यान जिल्हाध्यक्ष राजेश सोलापन यांच्यासह अनिल देठे उपाध्यक्ष, विनोद पन्नासे, सचिव, धर्मेश निकोसे, पुरुषोत्तम चौधरी महासचिव, प्रकाश हांडे कोषाध्यक्ष, प्रभाकर आवारी सह-सचिव, धनराज कोवे, नवजोत झाडे, विक्की गुप्ता या जिल्हा पदाधिकाऱ्यांनी सर्व नवनियुक्तांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment