Ads

अवैध रेती भरलेला ट्रॅक्टर पकडला ,सिंदेवाही महसुल विभाग ऍक्शन मोडवरTractor loaded with illegal sand caught, Sindevahi Revenue Department on action mode

(प्रशांत गेडाम))सिंदेवाही-- सिंदेवाही तालुक्यातील पळसगाव जाट येथे रविवारी सकाळी 8 वाजता पळसगाव जाट येथे रेतीची वाहतूक करणारा ट्रॅक्टर जप्त करण्यात आला
Tractor loaded with illegal sand caught, Sindevahi Revenue Department on action mode
सिंदेवाही तालुक्यात रेती चोरीला आळा घालण्याच्या उद्देशाने तहसील कार्यालयामार्फत भरारी आणि दक्षता पथके कार्यरत करण्यात आली आहे. भरारी पथकाने गस्ती दरम्यान पळसगाव ते देलणवाडी मार्गांवरील स्मशानभूमी जवळ निरीक्षनाकरिता ट्रॅक्टर क्रमांक MH 34 L 2303 थांबवला असता वाहनामध्ये 1 ब्रास रेती आढळून आली. पथकाने ट्रॅक्टर चालकाकडे रेती परवान्याबद्दल विचारणा केली असता कोणताही वैध परवाना नसल्याचे चालकाने सांगितले. त्यामुळे अवैध रेती वाहतूक करत असल्याने ट्रॅक्टर तहसील कार्यालयात आणून जप्त करण्यात आला. सदर कारवाई तहसीलदार संदीप पानमंद यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार मंगेश तुमराम, महसूल सेवक तुलसीदास गेडाम, आकाश श्रीरामे यांनी केली. तहसील प्रशासनाने गेल्या 10 दिवसात केलेली ही तिसरी कारवाई असून परीणामी रेती तस्करांच्या दिवसागणिक मुजोऱ्या वाढून प्रशासनाला तुरी देण्याचे षडयंत्र नित्याचेच झाले असून सातत्याने सिंदेवाही महसूल विभाग ऍक्शन मोडवर येत रेती तस्करांचे मनसूबे हानुन पाडण्यासाठी  तहसीलदार पानमंद, नायब  तहसीलदार मंगेश तुमराम सातत्याने प्रयत्नशील आहेत.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment