Ads

लाडबोरी शेतशिवारातील सरकारी नाल्याजवळ आढळला पट्टेदार वाघाचा मृतदेह

सिंदेवाही :-आज दि. 02.01.2025 रोजी बिट वनरक्षक, सिंदेवाही हे सिंदेवाही वनपरिक्षेत्र उपक्षेत्र सिंदेवाही, नियतक्षेत्र सिंदेवाही मध्ये नियमित सकाळची गस्त करीत असतांना मौजा लाडबोरी शेतशिवारातील रमेश पांडूरंग गंडाईत रा. सिंदेवाही यांचे मालकीचे शेत सर्व्हे क. 343 ला लागुन असलेल्या सरकारी नाल्याजवळ वाघ मृत अवस्थेत असल्याचे आढळून आले.
The body of a striped tiger was found near a government drain on the outskirts of Ladbori farm.
सदर माहिती भ्रमणध्वनी व्दारे संबंधीत वनरक्षकाकडून निम्नस्वाक्षरीकर्ते यांना सकाळी 08:00 वाजता प्राप्त होताच अधिनिस्त क्षेत्र सहायक, श्री. एन. टी. गडपायले, वनरक्षक श्री. फुलझले व अधिनिस्त कर्मचारी तसेच आर.आर.यु. सिंदेवाही वनकर्मचा-यांना घेवून मौकास्थळी पोहचले. सदर घटनेची माहिती वरिष्ठ अधिका-यांना कळविण्यात आली. त्यानंतर घटनास्थळावर मा. श्री. राकेश सेपट, भा.व.से. उपवनसंरक्षक, ब्रम्हपुरी वनविभाग, ब्रम्हपुरी, मा. श्री. एम. बी. चोपडे, सहायक वनसंरक्षक, (प्रादे. व वन्यजीव), ब्रम्हपुरी वनविभाग, ब्रम्हपुरी मा. श्री. महेश गायकवाड, सहायक वनसंरक्षक, (तेंदू), ब्रम्हपुरी वनविभाग, ब्रम्हपुरी, डॉ. रविकांत खोब्रागडे, पशुवैद्यकीय अधिकारी, (वन्यजीव) TATR चंद्रपुर, चंद्रपुर NTCA चे प्रतीनिधी श्री. बंडु धोत्रे, मानद वन्यजीव रक्षक, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) चे प्रतिनिधी श्री. मुकेश भांदककर, NGO स्वॉब नेचर केअर फॉन्डेशन चे अध्यक्ष श्री. यश कायरकर, RRT टीम चंद्रपुर, श्री. राकेश अहुजा, जीवशास्त्रज्ञ, ब्रम्हपुरी वनविभाग, ब्रम्हपुरी डॉ. सुरपाम, पशुधन विकास अधिकारी, पंचायत समिती, सिंदेवाही, डॉ. शालीनी लोंढे, पशुवैद्यकीय अधिकारी, सिंदेवाही डॉ. बजरंग सावरे, पशुवैद्यकीय अधिकारी, पेटगांव यांचे उपस्थितीत मृत वाघाचे निरिक्षण करण्यात आले. सदर मृत वाघ (नर) वयोवृध्द असल्याचा प्राथमिक निरिक्षणावरून दिसुन आले. सदर, वाघाचे सर्व अवयव शाबुत होते. वन अधिकारी व पशुवैद्यकीय अधिकारी यांचे उपस्थितीत पंचासमक्ष मौका पंचनामा नोंदविण्यात आला. त्यानंतर पशु वैद्यकीय अधिकारी यांचेकडून घटनास्थळी शवविच्छेदन करून उत्तरिय तपासणी करीता विसेरा घेण्यात आले व घेतलेला विसेरा पंचासमक्ष पशुवैद्यकीय अधिकारी यांनी सिलबंद करून दिला. पंचनामा, शवविच्छेदन व इतर संपुर्ण कार्यवाही पुर्ण झाल्यानंतर सदर मृत वाघाचे वरिल सर्व अधिकारी व पंचासमक्ष घटनास्थळावरच दहन करण्यात आले. सदर घटनेबाबत श्री. व्ही. पी. फुलझले, वनरक्षक सिंदेवाही यांनी पी. ओ.आर. क. 09126/228143 दि. 02.01.2025 अन्वये वनगुन्हा नोंदविला. पुढील तपास सुरू आहे. तसेच, सदर मृत वाघाचे घेतलेले विसेरा प्रयोगशाळेत पाठविण्यात येत असुन त्यांचे अंतिम अहवाल प्राप्त झाल्यानंतरच मृत नर वाघाचे मृत्यू कशामुळे झाले याचे निदान करण्यात येईल.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment