चंद्रपुर :-बनावट व बोगस खोटे दस्ताऐवज तयार करुन नोटरीच्या आधारे आदीवासींच्या जमिनीवर कुठलीही परवानगी न घेता 91 प्लॉट पाडून प्रत्येक प्लॉट 5-6 लाख रुपयांत विक्री करित असल्याबाबत आरोपींवर कार्रवाई करून आदिवासी परीवाराला न्याय मिळवून देण्याची मागणी पीडीत आदीवासी परीवार आणि विनोद खोब्रागडे यांनी पत्रपरिषदेत केली आहे.
बल्लारपूर शहरातील सर्वे क्रमांक 31/60, आराजी 1.62 हे.आर. सारा 3.00 रुपये भो. वर्ग २, ही चार एकर जमीन सुघोष पांडूरंग महेशकर वय 72 वर्षे असून ते वयोवृद्ध आहेत व सदरहू जमीन त्यांच्या वडिलोपार्जीत मालकीची असून ते आदिवासी जमातीचे आहे. त्यांच्या सातबारा मध्ये सक्षम प्राधिका_यांच्या पूर्व परवानगीशिवाय हस्तांतरणास मनाई असे स्पष्ट नमुद आहे. एवढेच नव्हे तर महाराष्ट्र जमीन महसुल अधिकार अभिलेख अधिनियम 1966 च्या कलम 36 व 36(अ) नुसार महाराष्ट्र शासनाने किंवा महसुल अधिका_यांनी कुठलीही परवानगी अकृषक करण्याची दिलेली नाही असे असतांना आरोपी श्रीहरी भद्रय्या अंचुरी, श्यामली श्रीहरी अंचुरी, बादल खुशालचंद उराडे दस्तलेखक(दलाल) व साक्षदार सुमित चंदु डोहणे यांच्या माध्यमातून सदर जमीनीवर गैरकायदेशिरपणे 91 प्लॉटस् पाडून सदरचे प्लॉट प्रत्येकी 5-6 लाख रुपये प्रमाणे रु. 100/- च्या स्टॅम्पर पेपरवर नोटरी करुन सदरहू प्लॉटची ताबापत्र करुन देत आहेत व त्यामध्ये सदरची जागा वाटपाची असून हिचे नियमीत परावर्तीत करणे शासन स्तरावरुन आवश्यक झाल्यास तर सर्व खर्चासह तुम्ही स्वतः करुन घ्यावे असे त्यावर लिहून खुले आम प्लॉट विकत घेणा_यांची फसवणुक करित आहेत अशी माहीती खोब्रागडे यांनी दिली.
ही जमीन ही आदिवासीची असून पुर्व परवानगीशिवाय हस्तांतरणास मनाई असे स्पष्ट सातबारा मध्ये लिहीलेले असतांना सुद्धा संबंधीत आरोपींनी सदरहू जमीनीमध्ये अवैधरित्या नियमबाह्य व बेकायदेशिर 91 प्लॉट पाडल्याचा आणि ताबापत्र करुन घेणा_यांची ही फसवणुक तर करतच आहे तसेच जमीन मालक व त्यांच्या दोन मुला-मुलींची फसवणुक करित आहेत असाही आरोप करण्यात आला. याबाबत महसुल अधिकारी व पोलीस अधिकारी यांना तक्रार देऊन सुद्धा आजपर्यंत कुठलीही उचित कारवाई न करता आपले कर्तव्यात दुर्लक्ष करीत आहे.
शासनाच्या परिपत्रकानुसार व सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय यांच्या जजमेंट नुसार आदिवासींची जमीन गैरआदीवासीयांना विना परवानगीने विक्री व ताबा देऊ शकत नाही तसे केल्यास अॅट्रॉसिटी अॅक्टच्या कलम 3(1)(5) नुसार फौजदारी गुन्ह्यास पात्र आहेत. त्यामुळे सदर प्रकरणात संबंधीत आरोपी श्रीहरी भद्रय्या अंचुरी, श्यामली श्रीहरी अंचुरी, बादल खुशालचंद उराडे दस्तलेखक (दलाल) व सुमित चंदु डोहणे साक्षदार यांच्यावर तात्काळ गुन्हे दाखल करुन सखोल चौकशी करावी व जागा मालक व त्याच्या परिवाराला न्याय मिळवून देण्यात यावा अशी मागणी विनोद खोब्रागडे यांनी केली आहे.
पत्रपरीषदेला सुघोष पांडुरंग महेशकर, किंतुषा प्रकाश गडपायले, नयना अमोल उईके आदि उपस्थित होते.
----------------------------------
0 comments:
Post a Comment