घुग्घुस:-स्थानिक मा. ना. श्री. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्राच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही प्रकाशित केलेल्या दिनदर्शिका -२०२५ चे विमोचन जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचे शुभहस्ते पार पडले.
Calendar released by MLA Sudhir Mungantiwar.
मा. आ. श्री. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्राच्या आजतागायत सेवाकार्याचा मागोवा घेणारी ही दिनदर्शिका इतल दिनदर्शिकांपेक्षा वेगळी आहे. यामध्ये शहरात आतापर्यंत झालेली आणि विकासलक्षी मानस ठेऊन प्रस्तावित केलेली विकासकामे यांचा समावेश आहे. याशिवाय या दिनदर्शिकेत प्रत्येक महिन्याचे औचित्य दर्शविणारे आकर्षक चहूबाजू वाचकांचे लक्ष वेधून घेतात.
विमोचनावेळी आमदार मुनगंटीवारांनी या वैविध्यपूर्ण दिनदर्शिकेचे वाचन करीत कौतुक केले आणि सेवा केंद्राच्या टीमला शुभेच्छा दिल्या.
ही दिनदर्शिका स्थानिक मा. आ. श्री. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रातर्फे शहरातील प्रत्येक घरोघरी जाऊन निःशुल्कपणे वितरीत करण्यात येणार आहे. अशी माहिती प्रकाशक तथा जिल्हा भाजपचे महामंत्री विवेक बोढे यांचेकडून यावेळी देण्यात आली.
या विमोचन कार्यक्रमात मंचावर आमदार किशोर जोरगेवार, आमदार देवराव भोंगळे, भाजपा जिल्हा महामंत्री विवेक बोढे, भाजपा महानगराचे जिल्हाध्यक्ष राहुल पावडे, नामदेव डाहुले, अल्काताई आत्राम, महेश देवकते,अमोल थेरे, विनोद चौधरी, तुलसीदास ढवस, मोमीन शेख यांचेसह मोठ्या संख्यने भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
0 comments:
Post a Comment